Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorized*येरवडा शासकीय वसतिगृहात 2026-27 साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू*

*येरवडा शासकीय वसतिगृहात 2026-27 साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू*

 

 

पुणे, दि. 4 (जिमाका, वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येरवडा येथील 1000 मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह (युनिट-4, गोल्फ क्लब, येरवडा) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.

 

इयत्ता 11 वी व 12 वीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 तर इतर अभ्यासक्रमांसाठी 15 जुलै 2026 आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.

 

वसतिगृहामध्ये विनामूल्य निवास व भोजन, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य भत्ता, गणवेश भत्ता, प्रकल्प भत्ता, छत्री-रेनकोट अनुदान तसेच संगणक, ग्रंथालय, क्रीडा व मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत.

 

अर्जासोबत मागील वर्षाची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बोनाफाईड, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड व रेशनकार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. बाहेरगावाहून पुण्यात शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन वसतिगृह प्रशासनाने केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments