Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिमणे , चिमणे, दार उघड ...

चिमणे , चिमणे, दार उघड …


——————————–

‘ चिमणे , चिमणे, दार उघड ‘
कावळा म्हणत असे कधीकाळी
‘ती’ चिमणी झाली आहे दुर्मिळ
दिसत नाही कोणत्याही स्थळी !!

‘चिमणी’ आता फक्त उरली
कारखान्यांच्या ‘धुराड्या’ पुरती
‘तिचे’ दर्शन घ्यावे लागते
‘गुगल’ मधल्या चित्रांमधूनी !!

हेच का तिचे ‘घरटे’ म्हणजेच ‘नेस्ट’
आणि हीच का ती ‘चिमणी’ उर्फ ‘स्पॅरो’
‘गुगल’ मधली चित्रे पाहून
कोणीतरी म्हणतो ‘ऑरो’ !!

‘चिऊ-काऊ’ च्या गोष्टी
आता केवळ पुस्तकातच उरल्या
आपल्या घरासाठी माणसाने झाडे कापून
‘त्यांना’ केले भूतकाळात जमा !!

—— श्रीकांत नारायण

( आजच्या जागतिक ‘चिमणी दिना’निमित्त )

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments