Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑफिस व इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक सेक्टर लीजिंगमध्ये पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी यंदाचे...

ऑफिस व इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक सेक्टर लीजिंगमध्ये पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी यंदाचे वर्ष विक्रमी ठरणार

वर्ष २०२४ मध्ये पुणे शहरात कार्यालयांसाठीचे (ऑफिस) भाडेतत्त्वावरील क्षेत्र गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च ७० लाख चौरस फुटांपर्यंत पोचण्याचे तर औद्योगिक व लॉजिस्टिक्ससाठीचे भाडेतत्त्वावरील क्षेत्र २४ लाख चौरस फुटांपर्यंत पोचण्याचा अंदाज

पुणे, २० मार्च, २०२४ – पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी कार्यालय व औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांसाठी जागा भाडे तत्वाने देण्यात (लीजिंग) यंदाचे वर्ष विक्रमी ठरण्याचा अंदाज भारतातील आघाडीची रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्म सीबीआरई साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेडने आज येथे जाहीर केला आहे. सीबीआरई इंडियाच्या माहितीनुसार पुण्यातील कार्यालय (ऑफिस) क्षेत्रासाठीचे भाडेतत्त्वावरील क्षेत्र वर्ष २०२४ मध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च म्हणजे ७० लाख चौरस फुटांपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. सध्या पुणे ही भारतातील सहावी सर्वांत मोठी ऑफिस बाजारपेठ आहे. पुण्यातील जमिनींची उपलब्धता हा या विकासाला चालना देणारा लक्षणीय घटक ठरला आहे. त्यामुळे विस्तारक्षम कार्यालय परिसरांचा विकास साधला असून उच्च दर्जाच्या मालमत्तांचे वैविध्यपूर्ण पर्याय स्पर्धात्मक किंमतीत पुरवणे शक्य झाले आहे आणि विस्तार किंवा स्थलांतर संधी मिळवू पाहणाऱ्या व्यवसायांना अत्यंत आकर्षक लाभ मिळत आहे.

ऑफिस लीजिंगने वर्ष २०२३ मध्ये ६३ लाख चौरस फुटांचा टप्पा गाठला होता. वर्ष २०२२ च्या तुलनेत ही वाढ १३ टक्के होती. या प्रगतीच्या मुळाशी उच्च दर्जाचा विकास, भक्कम बौद्धिक संग्रह व स्पर्धात्मक किंमती होत्या. विशेषतः शहराच्या औंध, बाणेर व विमाननगर अशा परिसरांत अधिक मागणी होती आणि या प्रत्येक परिसराने जवळपास प्रत्येकी १५ लाख चौरस फूट भाडेतत्त्वावरील जागा पुरवली. प्रेस्टिज व सलारपुरिया यांसारख्या कंपन्या आणि मॅपलट्रीसारख्या गुंतवणूकदार संस्थांनी या बाजारपेठेत प्रवेश केल्याने अधिक चालना मिळाली.

Year-wise Office absorption-supply in Pune (in mn. sq. ft.)

Year

Absorption

Supply

2019

6.9

5.0

2020

3.5

3.7

2021

3.3

6.0

2022

5.6

4.3

2023

6.3

5.3

2024 (Estimated)

7.0

6.3

कोविड साथीसारख्या अनिश्चिततांमुळे फ्लेक्झिबल कार्यक्षेत्र कंपन्यांनी पुण्यात लीजिंग व्यवसायाचा लक्षणीय हिस्सा प्राप्त केला. या सोईस्कर भाडेतत्त्वावरील जागांमुळे कंपन्यांना कामकाजासाठी नवी स्थळे शोधण्यास व कार्यस्थळांचे वेगवान पर्याय विचारात घेण्यास मदत मिळते. बँकिंग, वित्तीय सेवा व विमा या क्षेत्राने विस्तारात आपली वाटचाल सुरूच ठेवली परंतु रिटर्न-टु-ऑफिस (आरटीओ) धोरणे आणि जागतिक आर्थिक समस्या अशा घटकांमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात लीजिंग व्यवहार साधारण आढळून आले.

पुण्यातील भक्कम बुद्धिसंपदा व स्पर्धात्मक रिअल इस्टेट बाजारपेठ हे प्रमुख घटक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी फायद्याचे ठरतात. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो व ॲक्सेंच्युअर अशा कंपन्यांनी पुण्यात कॅम्पस स्थापन केल्याच्या उदाहरणातून ते सिद्ध झाले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे बाजारपेठेच्या सुप्त सामर्थ्यात भक्कम आत्मविश्वास प्रतिबिंबित झालेला आढळतो. त्याहीपुढे शहरातील ऑफिस बाजारपेठेला आगामी उच्च दर्जाच्या कार्यालय विकासामुळे आणि सातत्यपूर्ण पायाभूत विकास प्रकल्पांमुळे बळकटी आली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ही मागणी स्थिर राहण्याचा तर दुसऱ्या सहामाहीत त्यात तेजी येण्याचा अंदाज आहे.

इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्ये लीजिंग तत्त्वावरील जागांत गेल्या सहा वर्षातील सर्वाधिक नोंदणी होण्याची शक्यता

‘सीबीआरई’च्या माहितीनुसार पुण्यातील औद्योगिक आणि इंडस्ट्रीयल अ‍ॅन्ड लॉजिस्टिक्स – आयअ‍ॅन्डएल क्षेत्रामध्ये वर्ष २०२४ मध्ये ३२ लाख चौरस फूट या अनुमानित पुरवठ्यासह अंदाजे २४ लाख चौरस फूट इतकी जागा भाडे तत्त्वावर (लीजिंग) जाण्याचा अंदाज असून गेल्या सहा वर्षातील सर्वाधिक नोंदणी होण्याची अपेक्षा आहे. शहरात मजबूत पाया असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाला पूरक असे लहान व मध्यम आकाराचे उपकरण उत्पादक मोठ्या संख्येने आहेत. चाकण, तळेगाव यांसारख्या भागात इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक्स पार्क्स हे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहेत. इतर सक्रीय ठिकाणांमध्ये सणसवाडी – रांजणगाव व पिंपरी-चिंचवड यांचा समावेश आहे.

वर्ष २०२३ मध्ये पुण्याने आयअ‍ॅन्डएल सेगमेंटमध्ये वर्ष २०२२ च्या तुलनेत ११३ टक्के वाढ दर्शवत १७ लाख चौरस फूट जागांची भाडे तत्त्वावर नोंदणी दर्शवली आहे. गोदामे (वेअर हाऊसिंग) व्यवहारांमध्ये थर्ड -पार्टी लॉजिस्टिक्स (3पीएल) कंपन्या, एफएमसीजी, ऑटो व अ‍ॅन्सीलरी उद्योग आघाडीवर होते. औद्योगिक क्षेत्रात नवोदित आणि प्रस्थापित अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांसह अभियांत्रिकी आणि उत्पादक कंपन्यांनी पुण्यात आपला विस्तार केला.

Year-wise I&L absorption-supply in Pune (in mn. sq. ft.)

Year

Absorption

Supply

2019

1.5

0.6

2020

1.2

0.0

2021

1.8

2.3

2022

0.8

1.5

2023

1.7

2.4

2024 (Estimated)

2.4

3.2

पुण्याचे औद्योगिक महत्त्व विशेष करून वाहन उत्पादक कंपन्यांमुळे ओळखले जाते.बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि डेमलर क्राईसलर यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी आपले प्रकल्प येथे स्थापन केले आहेत. वाहन उद्योगाव्यतिरिक्त मशिन टूल्स, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या अभियांत्रिकी आणि उत्पादक कंपन्या पुण्यात आहेत.

‘सीबीआरई’च्या भारत,दक्षिण-पूर्व आशिया,मध्य पूर्व आणि आफ्रिका क्षेत्राचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅक्झिन म्हणाले की, पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या भरभराटीमध्ये अनेक घटकांचे योगदान आहे. शहर हे मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचबरोबर चांगल्या पायाभूत सुविधा या व्यवसाय, कामकाज अखंडपणे सुरू राहण्यासाठी पूरक आहेत. शिवाय कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे प्रस्थापित करू पाहणार्‍या किंवा विस्तार करू पाहणार्‍या कंपन्यांसाठी पुणे हे आकर्षक ठिकाण आहे. त्यामुळे असे अनेक फायदे असलेले पुणे शहर रिअल इस्टेटसाठी देशातील एक प्रमुख ठिकाण बनले असून गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना आकर्षित करत आहे.

‘सीबीआरई इंडिया’च्या अ‍ॅडव्हायझरी आणि ट्रँझॅक्शन सर्व्हिसेसचे कार्यकारी संचालक अनुज धोंडी म्हणाले की, पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठ विविध सूक्ष्म प्रकारांसह मजबूत वाढ दर्शवित आहे. ऑफिस सेक्टरमध्ये औंध, बाणेर आणि विमाननगरसारख्या प्रमुख ठिकाणांना जोरदार मागणी आहे. त्यातील प्रत्येकाने वर्ष २०२३ मध्ये सुमारे १५ लाख चौरस फूट जागा दर्शविली आहे. या भरभराटीच्या बाजारपेठेत स्थान मिळविण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि प्रमुख विकसकांसह नवीन कंपन्यांना आकर्षित करत आहे. चाकण-तळेगाव, सणसवाडी- रांजणगाव आणि पिंपरी चिंचवड यांसारख्या प्रस्थापित ठिकाणांसह व असंख्य उपकरण उत्पादकांसह इंडस्ट्रीयल आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात हा सकारात्मक कल प्रतिबिंबित होत आहे. बाजारपेठेतील ही वैविध्यता ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करत असून पुण्याच्या यशात भर घालत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments