Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोथरूडमध्ये राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे दिमाखदार उद्घाटन.

कोथरूडमध्ये राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे दिमाखदार उद्घाटन.

पुणे

भारतीय विचार साधना फाउंडेशन पुणे यांनी दिनांक २४ ते २८ जून या कालावधीत सकाळी ९:३० ते रात्री ९ पर्यंत कोथरूडमधील मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिर आय एम सी सी हॉल येथे राष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केला आहे.

राष्ट्रीय पुस्तक मेळ्यात ६० पेक्षा अधिक प्रकाशकांची १३०० हून अधिक विविध विषयांवरील पुस्तके ही एकाच ठिकाणी पुस्तकप्रेमींना सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. पुणेकर पुस्तकप्रेमी मंडळींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक अरविंद रावेतकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे उद्घाटन छत्रपती संभाजी भाग संघचालक श्री.अनिलजी व्यास व कोथरूड नगर संघचालक श्री बिपिन पाटसकर यांचे हस्ते झाले.

याप्रसंगी भावी साचे अभयराव थिटे अपूर्व सोनटक्के अजय कात्रे काशिनाथ देवधर नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी भाजपा कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी, भारतीय शिक्षण मंडळाचे प्राध्यापक मेहेंदळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments