Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाढदिवस,लग्न समारंभ, सण व कौटुंबिक आनंदाचे क्षण साजरे करताना सामाजिक भान महत्त्वाचे...

वाढदिवस,लग्न समारंभ, सण व कौटुंबिक आनंदाचे क्षण साजरे करताना सामाजिक भान महत्त्वाचे – संदीप खर्डेकर.

 

 

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे “अब नॉर्मल” दिव्यांग केंद्राला आवश्यक साहित्य भेट.

 

वाढदिवस,लग्न समारंभ,सण व कौटुंबिक आनंदाचे क्षण साजरे करताना सामाजिक भान महत्त्वाचे असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले. आपण कोणत्याही समारंभात नातेवाईक, मित्र परिवार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करतो, त्यांना उत्तम सजावट केलेल्या मंगल कार्यालयात भरपेट भोजनासह रिटर्न गिफ्ट देऊन आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतो.यात गैर काहीच नाही पण त्याच वेळी आपल्या कडील अतिरिक्त निधी किंवा काही अंशी निधी बाजूला काढून समाजातील वंचित घटकांना त्यातून मदत केल्यास अधिक पुण्य प्राप्ती आणि मानसिक समाधान लाभते असे मत ही क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.

त्यांचे नातू चि. कार्तिक कल्याणी प्रतीक खर्डेकर याच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोथरूड मधील “अब नॉर्मल” ह्या विशेष मुलांच्या शाळेला दोन कपाट, सतरंजी व खाऊ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. Joy of Giving म्हणजेच “देण्यातला आनंद” याचे संस्कार लहानपणापासून मुलांमध्ये रुजविले पाहिजेत असेही खर्डेकर यांनी सांगितले.

यावेळी चि. कार्तिक च्या आजी व वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,वडील प्रतीक खर्डेकर, आई कल्याणी खर्डेकर,संस्थेच्या संचालिका किशोरीताई पाठक, संस्थेच्या शिक्षिका मेघना मिठभाकरे, सुजाता जावळे, अवंती राळेगावकर, वैशाली जहागीरदार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

“अब नार्मल” च्या संचालिका किशोरीताई पाठक यांनी संस्थेची माहिती देताना सांगितलं की “आमच्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांच्या आवडीप्रमाणे कोर्सेस डिझाईन केले जातात, आजवर वीस मुलं येथे शिकून स्वतः च्या पायावर उभी असून अर्थार्जन करत आहेत. एक प्रकारे हे विशेष मुलांचे पुनर्वसन केंद्र असल्याचेही सौ. किशोरीताई पाठक म्हणाल्या.

शहर व जिल्ह्यातील वृद्धाश्रम, अंधशाळा, दिव्यांग केंद्र,विशेष मुलांच्या शाळा, निराधार केंद्र यासह विविध संस्थांना साहित्याची नितांत गरज असते, आपण अनावश्यक खर्चाला फाटा दिल्यास त्यातून काही प्रमाणात अश्या गरजू संस्थांना मदतीचा हात देता येतो असे मत सौ.मंजुश्री खर्डेकर व सौ कल्याणी खर्डेकर यांनी व्यक्त केली.

क्रिएटिव्ह फाउंडेशन ला दानशूरांकडून मिळालेल्या देणगयांव्यतिरिक्त आमच्या कमाईतील काही भाग हा समाजकार्यासाठी खर्च करण्यातला आनंद विरळाच असल्याचे प्रतीक खर्डेकर म्हणाले.

सेवाकार्य हे समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीच्या विना शक्य नसते हे समजून घेऊन अश्या वेगळं कार्य करणाऱ्या संस्थांना मदत केली पाहिजे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments