Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपालखी सोहळ्यानिमित्त ९ जुलै रोजी आरटीओ आळंदी रस्ता व आयडीटीआरचे कामकाजात बदल*

पालखी सोहळ्यानिमित्त ९ जुलै रोजी आरटीओ आळंदी रस्ता व आयडीटीआरचे कामकाजात बदल*

 

 

पुणे दि. ६ (जिमाका, वृत्तसेवा): संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ९ जुलै २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता कार्यालयातील वाहन तपासणी व अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीचे नियमित कामकाज होणार नाही. तसेच आयडीटीआरकडे जाणारे मार्ग बंद राहण्याची शक्यता असल्याने तेथील चाचण्यांवरही परिणाम होणार आहे.

९ जुलै रोजी वाहन तपासणी किंवा अनुज्ञप्ती चाचणीसाठी अपॉइंटमेंट असलेल्या सर्व अर्जदारांना १० ते २० जुलै २०२६ या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन दिवशी उपस्थित राहून चाचणी देता येणार असून, ९ जुलैची अपॉइंटमेंट वैध (ग्राह्य) मानली जाणार आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments