Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएलएस इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार, कामकाज १०० हून अधिक देशांमध्ये सुरू

बीएलएस इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार, कामकाज १०० हून अधिक देशांमध्ये सुरू

 

कंपनीने आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका खंडांमध्ये आपल्या कामकाजाचा विस्तार करत जागतिक स्तरावर आपले स्थान अधिक दृढ केले आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मधील विक्रमी कामगिरीनंतर हा टप्पा गाठला आहे वार्षिक आधारावर ३६.७ टक्‍के वाढीसह एकूण महसूल २,९९८ कोटी रुपये, तर वार्षिक आधारावर ३४.१ टक्‍के वाढीसह निव्वळ नफा ७२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली, १३ जुलै २०२६: बीएलएस इंटरनॅशनल या सरकार व नागरिकांसाठी जागतिक स्तरावर आघाडीच्‍या एआय आणि तंत्रज्ञान-सक्षम सेवा पुरवणाऱ्या भागीदार कंपनीने आज घोषणा केली की, आता त्यांचे कामकाज १०० हून अधिक देशांमध्ये विस्तारले आहे. कंपनी ४६ पेक्षा जास्त सरकारी ग्राहकांना सेवा देत आहे, आपल्या व्हिसा अॅप्लिकेशन सेंटर्स (व्हीएसी) आणि कार्यालयांच्या जागतिक नेटवर्कद्वारे नागरिक व कॉन्सुलर सेवांचा विस्तीर्ण पोर्टफोलिओ प्रदान करत आहे.

बीएलएस इंटरनॅशनलचा १०० हून अधिक देशांमध्ये झालेला विस्तार जागतिक गतिशीलता सुलभ करण्याच्या आणि नागरिक सेवा प्रदान करण्याच्या त्यांच्या दोन दशकांच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा विकास नवीन बाजारपेठांमधील धोरणात्मक विस्तार, सरकारी ग्राहकांसोबत भागीदारी, धोरणात्मक संपादन आणि तंत्रज्ञानावर आधारित नाविन्‍यता यांमुळे शक्य झाला आहे. आज ही कंपनी प्रबळ जागतिक नेटवर्कद्वारे सुरक्षित, कार्यक्षम आणि नागरिक-केंद्रित सेवा प्रदान करत जगभरातील सरकारांसाठी विश्वासू सहयोगी आहे.

या महत्त्वाच्या टप्प्याबाबत मत व्‍यक्त करत बीएलएस इंटरनॅशनलचे जॉइण्‍ट मॅनेजिंग डायरेक्टर शिखर अग्रवाल म्हणाले, “१०० देशांपर्यंत पोहोचणे हा बीएलएस इंटरनॅशनलच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि जगभरातील सरकारांनी व नागरिकांनी दोन दशकांहून अधिक काळ आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. उत्कृष्ट व्यावसायिक कार्यपद्धती आणि डेटा संरक्षण व सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करून आम्ही हे यश मिळवले आहे. यामुळे आम्ही कार्यरत असलेल्‍या बाजारपेठेत विनासायास आणि नागरिक-केंद्रित सेवा प्रदान करू शकलो आहोत. भविष्याचा विचार करता आम्ही नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान-सक्षम उपायांमध्ये गुंतवणूक करत राहू, ज्यामुळे सरकारी सेवा जगभरातील नागरिकांसाठी अधिक सुलभ, कार्यक्षम आणि भविष्य-सुसज्ज होतील. आमचा प्रत्येक स्तरावर सेवांचा दर्जा आणि अर्जदारांचा अनुभव सुधारण्यावर भर कायम राहील.”

बीएलएस इंटरनॅशनलने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत आणि संपूर्ण वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर हा टप्पा गाठला आहे. कंपनीने नवीन कंत्राटे आणि करारांचे नूतनीकरण यांद्वारे आपली उपस्थिती विस्तारणे आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे सुरूच ठेवले आहे. या वर्षातील कंपनीचा महसूल २,९९८ कोटी रुपयांवर आणि निव्वळ नफा ७२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, दोन्हीमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, ईबीआयटीडीए ३०.१ टक्‍क्‍यांनी वाढून ८१९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, ज्‍यामधून कंपनीची स्वत: व्‍यवस्‍थापित केलेल्‍या कार्यप्रणालीमुळे नफ्याच्या मार्जिनमध्ये झालेली वाढ दिसून येते.

बीएलएस इंटरनॅशनल जगभरातील सरकारांनी आणि अर्जदारांनी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा आदर करते आणि सेवांचा दर्जा, कामकाजातील कार्यक्षमता व अर्जदारांचा एकंदरीत अनुभव सतत सुधारण्यासाठी कटिबद्ध

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments