Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी भरलेला गणना फॉर्म बीएलओकडे तातडीने जमा...

मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी भरलेला गणना फॉर्म बीएलओकडे तातडीने जमा करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ३१ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश मतदारांनी गणना (Enumeration) फॉर्म भरून दिला आहे. मात्र, काही मतदारांनी भरलेले फॉर्म अद्यापही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे परत केलेले नाहीत. अशा सर्व मतदारांनी कोणताही विलंब न करता आपला भरलेला गणना फॉर्म संबंधित बीएलओकडे जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानुसार प्राप्त होणाऱ्या गणना फॉर्मच्या आधारे मसुदा मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी गणना फॉर्म भरला असूनही तो अद्याप बीएलओकडे सुपूर्द केलेला नाही, त्यांनी तो तातडीने जमा करावा.

 

वेळेत गणना फॉर्म जमा केल्यास संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुनिश्चित होईल. त्यामुळे कोणत्याही पात्र मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही. नागरिकांनी या प्रक्रियेस सहकार्य करून भरलेले गणना फॉर्म त्वरित संबंधित बीएलओकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments