Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरक्राम्य लिखत अधिनियमाच्या कलम १३८ अंतर्गत विशेष लोकअदालतीत २०१ प्रकरणे सामोपचाराने निकाली*

परक्राम्य लिखत अधिनियमाच्या कलम १३८ अंतर्गत विशेष लोकअदालतीत २०१ प्रकरणे सामोपचाराने निकाली*

 

 

पुणे, दि. १: ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे श्री. ए. टी. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय, पुणे येथे परक्राम्य लिखत अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दाखल प्रकरणांच्या तडजोडीसाठी विशेष लोकअदालतीचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले.

 

या विशेष लोकअदालतीसाठी एकूण १५ लोकअदालती पॅनेल (बेंच) स्थापन करण्यात आले होते.

लोकअदालतीमध्ये ३ हजार ७४२ प्रलंबित प्रकरणे सुनावणीस घेण्यात आली. त्यापैकी २०१ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली.

निकाली निघालेल्या प्रकरणांमधील एकूण दावा रक्कम ५ कोटी ६६ लाख ८६ हजार ४६३ रुपये इतकी होती. तडजोडीद्वारे ५ कोटी ७५ लाख ३१ हजार ६८० रुपये इतक्या रकमेवर समझोता करण्यात आला.

 

विशेष लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व न्यायिक अधिकारी, लोकअदालत पॅनेल सदस्य, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

परक्राम्य लिखत अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत पुढील विशेष लोकअदालत २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून, या लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेवती रा. देशपांडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments