पुणे : श्री चिंतामणी चॅरिटेबल ट्रस्ट, थेऊरच्या मोफत भोजन प्रसाद अर्थात अन्नदान सेवेचे १२ वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण झाले आहे. या कालावधीत तीन लाखांहून अधिक भाविकांनी या अन्नदान सेवेचा लाभ घेतला आहे. या सेवेच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी श्री महागणेश याग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री चिंतामणी चॅरिटेबल ट्रस्ट थेऊरचे मुख्य विश्वस्त मंगलमूर्ती विनायक आगलावे यांनी दिली.
हा धार्मिक सोहळा सकाळी ११ वाजता श्री चिंतामणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या श्रीरामकृपा हॉल येथे होणार आहे. श्री चिंतामणी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे १५ ऑगस्ट २०१४ पासून मोफत भोजन प्रसादाची अन्नदान सेवा सुरू आहे.
गेल्या १२ वर्षांत तीन लाखांहून अधिक भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अन्नदान सेवेचे हे कार्य पुढेही अखंड सुरू राहावे, यासाठी श्री अन्नपूर्णा कृपेने श्री महागणेश याग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून श्री महागणेश याग व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. संपर्क – 9763644521 / 9922484964


