Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिलीप हर्डीकर स्मृती क्रिकेट लीग नवदीप तरूण मित्र मंडळाला विजेतेपद

दिलीप हर्डीकर स्मृती क्रिकेट लीग नवदीप तरूण मित्र मंडळाला विजेतेपद

पुणे ः विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसऱ्या दिलीप उर्फ गॅरी हर्डीकर स्मृती एकदिवसीय क्रिकेट लीगमध्ये नवदीप तरूण मित्र मंडळाने पार्क व्ह्यू रॉयल संघाचा सात गडी राखून पराभव करीत विजेतेपद मिळविले.

भांडारकर इन्स्टिट्यूटच्या मैदानावर झालेल्या लढतीत पार्क व्ह्यू रॉयल संघाने सहा षटकात ३ बाद ३७ धावा केल्या तर नवदीप तरूण मंडळाने ३.४ षटकांत बिनबाद ४० धावा करून विजय मिळविला.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ कुणाल कोंडे ठरला. ‘उत्कृष्ट फलंदाज’ हा मान गणेश मोहेकर तर उत्कृष्ट गोलंदाज’ हा मान नीलेश गोरेने पटकाविला.

या स्पर्धेचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले. तर बक्षिस समारंभप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) माजी अध्यक्ष ॲड. अभय आपटे, जलतरण प्रशिक्षक मनोज एरंडे, माजी रणजी क्रिकेटपटू रणजित पांडे, श्रीनिवास कुलकर्णी, नंदकिशोर जकातदार, स्पर्धा संयोजक नगरसेवक सुनील पांडे-लोहगांवकर, अभिजित मोडक, वरुण जकातदार, समीर हळंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मोरे यांनी केले.

संक्षिप्त धावफलक

पार्क व्ह्यू रॉयल संघ – (६ षटकांत) ३ बाद ३७ धावा (रोहित चव्हाण २३, कुणाल कोंडे १-१, महेश मोरे १-७) पराभूत विरुद्ध नवदीप तरुण मित्र मंडळ – (३.४ षटकांत) बिनबाद ४० धावा (महेश मोरे नाबाद १८, कुणाल कोंडे नाबाद १८)
—————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments