पुणे, दि.२०: शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कामकाज करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मौजे दिवे कार्यालय शनिवार दिनांक २२ व २३ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहे.
स्कूल बस, व्हॅन यांचे वाहनचालक, मालक, संघटना यांनी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी वाहने मौजे दिवे, प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे सादर करुन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे, असे आावाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप खडसे यांनी केले आहे.
00000


