Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमआयटी इंडियाच्या इंडस्ट्री–इन्स्टिट्यूट रीकनेक्ट समिट २०२६ मध्ये ७०० हून अधिक उद्योग, शिक्षण...

एमआयटी इंडियाच्या इंडस्ट्री–इन्स्टिट्यूट रीकनेक्ट समिट २०२६ मध्ये ७०० हून अधिक उद्योग, शिक्षण आणि नाविन्यता क्षेत्रातील दिग्गज सहभागी

पुणे, २१ ऑगस्ट २०२६
एमआयटी इंडियाने आज पुण्यातील हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल, वाकड येथे
इंडस्ट्री–इन्स्टिट्यूट रीकनेक्ट समिट (आयआरएस) २०२६चे उद्घाटन केले. शिक्षण क्षेत्र
आणि उद्योग यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच टॅलेंट, नाविन्यता आणि
उद्योजकतेच्या क्षेत्रातील नव्या संधींचा शोध घेण्यासाठी आयोजित या दोन दिवसीय
समिटमध्ये देशभरातून ७०० हून अधिक सहभागी एकत्र आले आहेत.
‘रीकनेक्ट’ या संकल्पनेवर आधारित ही समिट शिक्षण क्षेत्र, कॉर्पोरेट जगत, स्टार्टअप्स,
गुंतवणूकदार, उद्योजक, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी यांना एका सामायिक व्यासपीठावर
आणत आहे. भविष्यातील टॅलेंट, नाविन्यता आणि उद्योजकतेला दिशा देणे हा या समिटचा
मुख्य उद्देश आहे.
तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती, बदलती व्यावसायिक प्रारूपे आणि नव्या युगातील करिअरच्या
संधी यांमुळे कर्मचारीवर्गाकडून अपेक्षित कौशल्ये आणि क्षमतांमध्ये मोठे बदल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर आयोजित आयआरएस २०२६च्या माध्यमातून शैक्षणिक संस्था आणि
उद्योगांना परस्परांचे दृष्टिकोन समजून घेण्याची, उदयोन्मुख कौशल्यांची गरज ओळखण्याची
आणि दीर्घकालीन सहकार्याचे मार्ग शोधण्याची संधी मिळत आहे.
आयआरएस २०२६मध्ये धोरणकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, उद्योगतज्ज्ञ आणि
एमआयटी इंडियाचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, ईवायचे कार्यकारी संचालक श्री. केदार देव
तसेच इतर मान्यवर आणि प्रमुख भागधारकांचा समावेश आहे.
उद्घाटन सत्रात अधिक जोडलेली आणि भविष्यासाठी सज्ज परिसंस्था उभारण्याच्या गरजेवर
भर देण्यात आला. उद्योगाभिमुख शिक्षण, सातत्यपूर्ण शिक्षण, नाविन्यता आणि उद्योजकता
यांचे महत्त्व अधोरेखित करताना वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी सक्षम युवा टॅलेंट

घडवण्याची आणि शिक्षण क्षेत्र व उद्योगांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त
करण्यात आली.
समिटच्या पहिल्या दिवशी कामाचे बदलते स्वरूप, टॅलेंटची वाढती गरज आणि भारतातील
भावी पिढीतील व्यावसायिक व उद्योजकांना सक्षम बनवण्यात शिक्षणाची भूमिका यांवर
सखोल चर्चा झाली. शिक्षण क्षेत्र आणि उद्योगांमधील दृढ भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना
प्रायोगिक शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उद्योगांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित
करण्याच्या अधिक संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, यावरही विचारविनिमय करण्यात आला.
नाविन्यता आणि उद्योजकता हा आयआरएस २०२६चा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.
एमआयटी इंडिया नॅशनल हॅकेथॉन आणि कॅपिटल नेक्सस स्टार्टअप पिचेससाठी ही समिट
राष्ट्रीय पात्रता व्यासपीठ म्हणून काम करणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी नवप्रवर्तक
आणि नवउद्योजकांना आपल्या संकल्पना सादर करण्याची, उद्योग क्षेत्रातील भागधारकांशी
संवाद साधण्याची तसेच मार्गदर्शन, सहकार्य आणि गुंतवणुकीच्या संधी शोधण्याची संधी
मिळणार आहे.
एमआयटी इंडियाचे माजी विद्यार्थी, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक यांची
व्यापक परिसंस्था या समिटच्या माध्यमातून एकत्र येत आहे. त्यामुळे वर्गखोलीच्या पलीकडे
जाऊन अर्थपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याची संधी निर्माण झाली आहे. एचआर अँड अॅलुमनी
अवॉर्ड्सच्या माध्यमातून परिसंस्थेतील सदस्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.
तसेच, माजी विद्यार्थ्यांच्या संवाद सत्रांमध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनातील
बदलत्या संबंधांवर अनुभव व दृष्टिकोनांची देवाणघेवाण केली जाणार आहे.
एमआयटी इंडियाचे ग्रुप डायरेक्टर श्री. दिग्विजय एस. कराड म्हणाले, “आयआरएस २०२६च्या
माध्यमातून साध्य करू इच्छित असलेल्या उद्दिष्टाच्या केंद्रस्थानी ‘रीकनेक्ट’ ही संकल्पना
आहे. शिक्षण क्षेत्र आणि उद्योगांमधील दरी केवळ संवादातून दूर होऊ शकत नाही. त्यासाठी
सातत्यपूर्ण सहभाग, सामायिक समस्या-निराकरण आणि विद्यार्थ्यांना तसेच नाविन्यपूर्ण
संशोधन करणाऱ्यांना उद्योगांसोबत जवळून काम करण्याच्या संधी आवश्यक आहेत.
“या समिटच्या माध्यमातून आम्ही शिक्षण क्षेत्र, उद्योगप्रमुख, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, माजी
विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणत आहोत. या संबंधांना अधिक दृढ करून त्यांचे
रूपांतर अर्थपूर्ण संधींमध्ये करणे हा आमचा प्रयत्न आहे. टॅलेंट, संकल्पना आणि उद्योगांच्या
गरजा एकत्र येऊन नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देतील, अशी परिसंस्था निर्माण
करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

महाराष्ट्रासह भारताच्या विविध भागांतून मिळालेल्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर आयआरएस
२०२६ उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील चर्चेला केवळ वेळोवेळी होणाऱ्या संवादापुरते मर्यादित न
ठेवता सातत्यपूर्ण सहकार्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे. धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ,
उद्योजक, गुंतवणूकदार, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी यांना एका व्यासपीठावर आणून
अधिक सक्षम टॅलेंट नेटवर्क, नाविन्यपूर्ण सहकार्य आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या संधी
निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
एमआयटी इंडियाच्या शैक्षणिक परिसंस्थेला उद्योग आणि व्यापक नाविन्यता समुदायाशी
जोडणारे व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टिकोनाचा हा समिट एक महत्त्वाचा भाग आहे. एमआयटी
इंडियाच्या नेटवर्कमध्ये एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी, पुणे; एमआयटी
आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (एमआयटीएसीएससी), आळंदी, पुणे; एमआयटी स्कूल
ऑफ डिस्टन्स एज्युकेशन; एमआयटी युनिव्हर्सिटी ऑफ मेघालय, शिलाँग, मेघालय; आणि
अवंतिका युनिव्हर्सिटी, उज्जैन, मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.
‘रीकनेक्ट’ ही मध्यवर्ती संकल्पना असलेली आयआरएस २०२६ भागधारकांना एकत्र येण्यासाठी,
विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि अर्थपूर्ण भागीदारी निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण
व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या माध्यमातून भारतातील भविष्यासाठी सज्ज टॅलेंट,
नाविन्यता आणि उद्योजकतेची परिसंस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

एमआयटी इंडियाविषयी
एमएईईआर ट्रस्टच्या अंतर्गत १९८३मध्ये स्थापन झालेली एमआयटी इंडिया ही भारतभरातील
७०हून अधिक संस्था आणि ६हून अधिक विद्यापीठांचा समावेश असलेली बहुविषयक शैक्षणिक
परिसंस्था आहे. प्रा. (डॉ.) विश्वनाथ डी. कराड यांच्या दूरदृष्टीतून उभारलेली एमआयटी इंडिया
शिक्षण, संशोधन, नाविन्यता आणि उद्योजकता यांना एकत्र आणत भविष्यासाठी सज्ज टॅलेंट
घडवण्यावर आणि सामाजिक प्रगतीला हातभार लावण्यावर भर देते. विविध विषयक्षेत्रांमध्ये
कार्यरत असलेली एमआयटी इंडिया शिक्षण क्षेत्र, उद्योग आणि व्यापक नाविन्यता परिसंस्था
यांच्यातील सहकार्याला सातत्याने चालना देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments