Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedखेळातील पंच हा न्यायाधीश असल्याने त्याने सत्याची कास सोडू नये - मुंबई...

खेळातील पंच हा न्यायाधीश असल्याने त्याने सत्याची कास सोडू नये – मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे

स्पर्धेतील पंच आणि निवाडा करणारा न्यायाधीश या दोघांचं कर्तव्य एकच असून त्यांनी सत्याची बाजू असणाऱ्याला आणि नियमानुसार योग्य असणाऱ्या विजेत्याच्या बाजूने आपलं मत दिलं पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश माननीय सुनील शुक्रे यांनी दीपप्रज्वलन करून केले. ते नागपूर येथे महाराष्ट्र ज्यूदो संघटनेद्वारा आयोजित पंचांच्या शिबिरात बोलत होते. यावेळी राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, महासचिव दत्ता आफळे, नागपूर संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी, सचिव मुकुंद डांगे, सतीश पहाडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

सुनील शुक्रे पुढे म्हणाले की ज्यूदोच्या तत्वांमधील एक महत्वाचे तत्व म्हणजे किमान परिश्रमामध्ये अधिकाधिक कार्यकुशलता संपादन करत समोरच्या व्यक्तीचा आदर राखणे हे आहे आणि जर हे तत्व प्रत्येक सर्वसामान्यांनी आचरणात आणले तर सभ्य समाज निर्मितीसाठी त्याचा खूप मोठा हातभार लागेल.

आमदार निवास सिविल लाईन्स येथे आयोजित राज्यस्तरीय ज्यूदो खेळाच्या पंचांचे शिबिर दिनांक 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते या शिबिरात 26 जिल्ह्यातील 114 ब्लॅक बेल्ट पंच प्रशिक्षकांनी नोंदणी केली होती. आंतरराष्ट्रीय फेडरेशन यांच्याद्वारे ऑलम्पिक सायकलमध्ये लागू केलेल्या नव्या नियमांची ओळख आंतरराष्ट्रीय पंच अवनीश भट, उत्तराखंड यांनी या शिबिरात करून दिली. दरम्यान ज्यूदो खेळाच्या नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केलेले श्री सुशील गायकवाड यांच्यासह आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा पास झालेले विजय यादव, स्मिता शेट्टी, शिल्पा सेरीगर यांच्यासह ज्यूदो खेळात पीएचडी प्राप्त केलेले राजकुमार गुप्ता यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शिबिरास राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष रवींद्र मेतकर, उपाध्यक्ष डॉक्टर गणेश शेटकर, ऍड विकास पाटील, सहसचिव डॉक्टर चंद्रशेखर साखरे यांच्यासह तांत्रिक समितीचे अध्यक्ष दर्शना लाखांनी योगेश धाडवे सचिन देवळे, निखिल सुवर्णा आणि अतुल बामनोदकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागपूर संघटनेचे प्रकाश मांडोकार, प्रकाश इजनकर, डॉ सुरेंद्र राऊत, नलिनी बळी, संगीता राऊत आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments