Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorized६३ वर्षीय महिलेच्या अवयवदानातून तिघांना मिळाले नवजीवन नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरमध्ये...

६३ वर्षीय महिलेच्या अवयवदानातून तिघांना मिळाले नवजीवन नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरमध्ये अवयवदान

पुणे, २२ ऑगस्ट २०२६ : मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श घालून देत पुण्यातील ६३ वर्षीय मेंदूमृत महिलेच्या कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे तीन रुग्णांना नवजीवन मिळाले . दीर्घकाळ नियंत्रणाबाहेर असलेल्या उच्च रक्तदाबामुळे झालेल्या मेंदूतील रक्तस्रावानंतर ( आयसी ब्लीड) १७ ऑगस्ट रोजी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या . त्यांना २१ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिल्यानंतर त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांसह यकृत काढण्याची शस्त्रक्रिया ( ऑर्गन रिट्रिव्हल ) करण्यात आली .

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पठारे यांनी सांगितले की, यकृताचे प्रत्यारोपण पुण्यातील ५५ वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आले. ते यकृताच्या अंतिम टप्प्यातील आजाराने त्रस्त होते. एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण बंगळुरू येथील ४९ वर्षीय दुकानदारावर करण्यात आले असून, ते दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते.

नोबल हॉस्पिटलमध्ये दोन्ही प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया २२ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या करण्यात आल्या, तर दुसरे मूत्रपिंड पुण्यातील अन्य एका रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले.

मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या टीम मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. विक्रम सातव, डॉ. शशिकांत भनगे आणि भूलतज्ज्ञ डॉ. संगीता चंद्रशेखर यांचा समावेश होता. यकृत प्रत्यारोपण टीम मध्ये यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. स्मिता पारख, डॉ. मनोज श्रीवास्तव आणि भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत कोटे यांचा समावेश होता . तसेच प्रत्यारोपण समन्वयक महेश तुपे यांचा समावेश होता.

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले, “अवयवदान हे मानवतेचे अत्यंत उदात्त आणि प्रेरणादायी रूप आहे. एखाद्या कुटुंबाच्या दुःखाचे रूपांतर इतरांसाठी आशा आणि नवजीवनात करण्याचे सामर्थ्य अवयवदानात आहे. अवयवदानाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे अशा कठीण प्रसंगीही कुटुंबीय आपल्या वैयक्तिक दुःखापलीकडे विचार करून इतरांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येत असल्याचे आपण पाहत आहोत. या जीवनदायी मोहिमेचे सुरळीत समन्वय आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी योगदान देणाऱ्या झेडटीसीसी पुणे तसेच सर्व वैद्यकीय आणि आरोग्यसेवा टीमचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments