पुणे, १ सप्टेंबर २०२६ : किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीने पुण्यातील अमेनोरा मॉल, हडपसर येथे महाराष्ट्रातील आपल्या १०व्या एक्सक्लुझिव्ह शोरूमचे उद्घाटन केले. हरी कृष्णा ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. पुणे आणि परिसरातील ग्राहकांना दर्जेदार, आधुनिक आणि विश्वासार्ह डायमंड व गोल्ड ज्वेलरीचा अनुभव उपलब्ध करून देणे हा या नव्या शोरूममागील प्रमुख उद्देश आहे.
उद्घाटनानिमित्त किसनाने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर १०० टक्क्यांपर्यंत, तर गोल्ड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. तसेच जुने सोने एक्सचेंज करून डायमंड ज्वेलरी खरेदी केल्यास १०५ टक्क्यांपर्यंत मूल्य मिळण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय तीन स्कूटी जिंकण्याची संधी असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मेगा लकी ड्रॉमध्ये कार जिंकण्याची संधीही ग्राहकांना मिळणार आहे.
“पुणे हे किसनासाठी महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे बाजारपेठ आहे. महाराष्ट्रातील १०व्या एक्सक्लुझिव्ह शोरूमची सुरुवात ही आमच्या विस्ताराच्या धोरणातील महत्त्वाची उपलब्धी आहे. ‘हर घर किसना’ या व्हिजननुसार डायमंड ज्वेलरी अधिकाधिक भारतीय कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे घनश्याम ढोलकिया यांनी सांगितले.
नव्या शोरूममध्ये दैनंदिन वापरापासून विशेष प्रसंग, सण-उत्सव आणि सेलिब्रेशनसाठी विविध आकर्षक डायमंड व गोल्ड ज्वेलरी कलेक्शन्स उपलब्ध असतील. ग्राहकांच्या बदलत्या पसंतीनुसार आधुनिक डिझाइन्स आणि प्रीमियम खरेदीचा अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे.
शोरूमच्या उद्घाटनासोबतच किसनाने सामाजिक बांधिलकीही जपली. स्वच्छ भारत अभियानाच्या समर्थनार्थ स्वच्छता मोहीम, ‘किसना प्रकृती’ अंतर्गत वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि समुदाय कल्याणाप्रती किसनाची बांधिलकी अधोरेखित झाली.


