Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorized‘आपल्या संततितून अर्जुन घडावेत’ या विषयावरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धेचे आयोजन*

‘आपल्या संततितून अर्जुन घडावेत’ या विषयावरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धेचे आयोजन*

 

 

पुणे, दि. २ – ‘घराघरातील तिसरी संतति (किंवा एक संतति)अर्जुन घडविण्यासाठी’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धा कौशलम् न्यासाच्या वतीने आयोजित करण्यात येत असून ही स्पर्धा संस्कृतसह सर्व भारतीय भाषांमधून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस), सुदर्शन टीव्ही. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व नागरी लिपी परिषदेच्या सहकार्याने ही निबंध स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती मुख्य संयोजिका माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे व एमईएसच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील यांनी आज येथे दिली. गेल्यावर्षी ‘आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?’ या विषयावरील निबंध स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला होता.

बारावीपर्यंतचे शालेय विद्यार्थी, बारावीनंतरचे महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्व नागरीक अशा तीन श्रेणींमध्य़े ही निबंध स्पर्धा होणार असून www.kyps.in या वेबपोर्टलवर नोंदणी करुन दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निबंध अपलोड करावयाचे आहेत. ‘घराघरातील तिसरी संतति अर्जुन घडविण्यासाठी’ किंवा ‘घराघरातील एक संतति अर्जुन घडविण्यासाठी’ असे दोन वैकल्पिक विषयांवर शालेय विद्यार्थ्यांनी सुमारे बाराशे शब्द, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुमारे दोन हजार शब्द आणि नागरिकांनी सुमारे अडीच हजार शब्दमर्यादेमध्ये निबंध पाठवायचे आहेत. प्रत्येक श्रेणी व भाषांनुसार रोख रु. दहा हजार, रु. साडेसात हजार व रु. पाच हजार अशी तीन रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेचा प्रतिसाद पाहून पारितोषिकांच्या संख्येत वाढ देखील केली जाणार आहे. या स्पर्धेचा निकाल नोव्हेंबर २०२६ अखेरीस घोषित होऊन डिसेंबर २०२६ मध्ये पारितोषिक प्रदान कार्यक्रम घेण्यात येणार आहे. https://youtube.com/@nibandhkaushalam या युट्यूब चॅनेलद्वारे तसेच https://www.facebook.com/share/g/1HHyQDpemS या फेसबुक पेजवर स्पर्धेची नियमावली, माहिती तसेच काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सुनिता फडके (8888234444), सचिन कानडे (8308820051) किंवा पवन भराडिया (9322314692) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या निबंधस्पर्धेच्या विषयामागची भूमिका सांगतांना मेहेंदळे म्हणाल्या की, आजची आधुनिक कुटुंबे जास्तीत जास्त एका संतानाचा विचार करतात. काहीठिकाणी तर मुल नकोच, अशी मानसिकता झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोनपेक्षा अधिक या सूत्राने “प्रत्येक घरातील तिसऱ्या संततिला, मग ती मुलगी असो वा मुलगा, त्यांना अर्जुन बनवणे” हा विचार केवळ एक कल्पना नव्हे, तर एक सामाजिक संकल्प आहे. खरे पहाता हा संकल्प पहिल्या व दुसऱ्या संततिलाही लागू आहे. समाजाची संख्यात्मक वाढ होताना येणारी पिढी संस्कारित, सक्षम आणि ध्येयवादी असेल तर ती राष्ट्राला उपकारक ठरते आणि हाच या संकल्पनेमागील मूलभूत विचार आहे. अर्जुन हे केवळ एका पौराणिक पात्राचे नाव नाही. अर्जुन म्हणजे कुशलता, एकाग्रता, समर्पण, विवेक, सरळपणा आणि निश्चयात्मकता यांचा संगम आहे. आजच्या भारताला अशाच खूपशा स्त्री व पुरुष अर्जुनांची गरज आहे. पहिल्यासकट सर्वच संतानांचे योग्य संगोपन, त्यांची शिक्षण-व्यवस्था, आर्थिक नियोजन, कौशल्य विकास, मानसिक तयारी – या सर्व प्रश्नांवर समाजाने मिळून योजनाबद्ध होऊन हातभार लावणे, हे सर्वकाही या स्पर्धेच्या मूळ उद्दिष्टाशी जोडलेले आहे. देशभरातील युवा पिढी या प्रश्नांवर विचार करेल, आपले मत मांडेल आणि हे घडविण्यासाठी नव्या वाटा सुचवेल – हीच या निबंध स्पर्धेची मूळ भावना आहे.

——————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments