Thursday, September 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवदिप तरुण मंडळातर्फे दहीहंडी उत्सवात सामाजिक संस्थांना ३३ हजारांची मदत

नवदिप तरुण मंडळातर्फे दहीहंडी उत्सवात सामाजिक संस्थांना ३३ हजारांची मदत

पुणे : नवदिप तरुण मंडळ ट्रस्ट, कसबा पेठ यांच्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी फडके हौद चौक येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे. यावेळी विविध संस्थांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक अध्यक्ष तुषार शिंदे यांनी केले आहे.

 

वाचन संस्कृती टिकविण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या समाजसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाच्या वतीने शेअर विथ इंडिया फाउंडेशन, कस्तुरी फाउंडेशन आणि वंचित विकास सामाजिक विकास संस्था या तीन संस्थांना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख मदत देण्यात येणार आहे.

 

दहीहंडी उत्सवानिमित्त कोल्लोळ आणि गंधार या वाद्यपथकांचे वादन होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments