पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवकाळात अनेक गणेशमंडळांमध्ये व विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेझरचा मोठा वापर होतो. त्यामुळे फार मोठे ध्वनिप्रदूषण होते. कांठळ्या बसणाऱ्या प्लाझ्मा प्रेशर मिडच्या आवाजामुळे अनेक वृद्ध व बालकांना या आवाजामुळे बहिरेपण येण्याचा त्रास होऊ शकतो. हे रोखण्यासाठी व आपला धार्मिक – सांस्कृतिक महोत्सव आनंदाने साजर व्हावा यासाठी प्लाझ्मा प्रेशर मीड सिस्टमवर पोलिसांनी बंदी घातल्यास साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन, पुणे यांचा यास पूर्ण पाठिंबा असेल असे साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष बबलू रमझानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, खजिनदार मेहबूब खान आणि कार्याध्यक्ष राजू कांबळे व इतर कमिटी मेंबर्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शिरीष पाठक, सुनील ओव्हाळ, रमेश धोत्रे, उदय इनामके, राजरत्न पवार, संतोष गायकवाड, ज्येष्ठ कमिटी सदस्य बंडूशेठ वाळवेकर हे उपस्थित होते.
ते म्हणाले की, पुण्यात संस्थेचे सुमारे ५५० सदस्य आहेत. गेल्या ७-८ वर्षांत मात्र पुण्याच्या बाहेरील भागातील काही व्यावसायिक पुण्यात या काळात प्लाझ्मा, प्रेशर, मिड व लेजर या नको वाटणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून परिस्थिती बिघडवत आहेत. आमच्या संस्थेचे सदस्य वापरत असलेल्या सिस्टीम्स दर्जेदार कंपन्यांनी केलेल्या असतात. ऐकणाऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी त्यात घेतलेली असते. आम्ही सिस्टीम, स्पीकर, अॅम्प्लीफायर, मिक्सर इत्यादी पुरवतो. प्लाझ्मा, प्रेशर, मिड व लेजर पुरवत नाही. याकाळात एवढी मागणी असते की देशातील अनेक व्यावसायिक इथे येऊन या सिस्टीम्स भाड्याने देतात. साउंड, लाईट, जनरेटर असा सारा व्यवसाय चालू राहावा व प्लाझ्मा, प्रेशर, मिड व लेजरचा वापर न करता आनंद व समाधानाने गणेशोत्सव व अन्य सण साजरे व्हावेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे.
मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याबाहेरील भागातील अनेक व्यावसायिक प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेजर याचा मोठ्या प्रमाणत वापर करतात. त्याचा खूप अतिरेक झाला. कोणताही साउंड सिस्टम विना प्रेशर मीड साधारणता ७०-८० डेसिबल असते. तेच प्लाझ्मा, प्रेशर, मिड वापरल्याने आवाजाची लेव्हल ११० डेसिबलच्याही पुढे जाते आणि त्यालाच आपण डी. जे. चा त्रास होतो असे म्हणतो. यासाठी आम्ही प्रबोधनही खूप करतोय. पोलीस आयुक्तांसमोरही आम्ही या संदर्भात प्रात्यक्षिक दिले आहे.
सर्वौच न्यायालयाने सायलेंट झोनला (४५ डी.बी.), रेसिडेन्शियलला (५५ डी.बी.) कमर्शियलला (६५ डी.बी.), इंडस्ट्रियलला (७५ डी.बी.) असे नियम घालून दिले आहेत. हा कायदा १९८६ चा आहे. याची अंमलबजावणी आपल्याकडे २००६ पासून सुरु झाली. आता मात्र अतिरेक झाला आहे. आम्ही प्रबोधन करतोय. मात्र शासन व पोलीस प्रशासन यांनी ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. मंडळांनी देखील त्यात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
पुणे शहरात २०००० साऊंड, लाईट, जनरेटरचे व्यवसायिक आहेत व त्यावर कमीत कमी २,००,००० व्यवसायिक व कुटुंबीय ही अवलंबून असतात याचा ही प्रशासनाने विचार करावा. पुण्यातील गणेशोत्सव कर्णकर्कश्य आवाजाचा त्रास न होता आनंदाने साजरा व्हावा यासाठी शासन व पोलीस प्रशासनाने प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेझरला बंदी घातल्यास आमच्या संघटनेचा पूर्ण पा
ठींबा आहे.


