Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सकडून स्मार्ट वेल्थ पेन्शन प्लॅन लाँच; ग्राहकांना समर्पित...

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सकडून स्मार्ट वेल्थ पेन्शन प्लॅन लाँच; ग्राहकांना समर्पित निवृत्ती निधी उभारण्यास मदत होणार

~ ५ फंड्स आणि ४ गुंतवणूक धोरणांच्या माध्यमातून इक्विटी-लिंक्ड वाढ ~

~ विविध जोखीम क्षमता आणि निवृत्ती उद्दिष्टांनुसार डिझाइन केलेला प्लॅन ~

मुंबई, सप्टेंबर १६, २०२६: आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“एबीएसएलआय”) या भारतातील अग्रगण्य वैविध्यपूर्ण आर्थिक सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलच्या जीवन विमा उपकंपनीने आज एबीएसएलआय स्मार्ट वेल्थ पेन्शन प्लॅन या युनिट लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाईफ इन्शुरन्स पेन्शन प्लॅनच्या लाँचची घोषणा केली. हा प्लॅन ग्राहकांना त्यांच्या भविष्यासाठी इक्विटी-लिंक्ड निवृत्ती निधी उभारण्यात आणि निवृत्तीच्या वेळी अॅन्युइटीद्वारे आजीवन नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी या निधीचा वापर करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केला आहे.

ग्राहक सहसा पाल्यांचे शिक्षण, घर किंवा कौटुंबिक सुट्टी यांसारख्या जीवन ध्येयांचे नियमितपणे नियोजन करत असले, तरी निवृत्तीच्या नियोजनाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. वास्तव हे आहे की निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न बंद होते. एबीएसएलआय स्मार्ट वेल्थ पेन्शन प्लॅन या नवयुगाच्या आणि अत्यंत नाविन्यपूर्ण निवृत्ती-केंद्रित इक्विटी-लिंक्ड प्रॉडक्टद्वारे ही दरी भरून काढतो, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सुवर्ण काळासाठी निवृत्ती निधी उभारणे शक्य होते.

प्रमुख वैशिष्ट्ये:

प्लॅन पर्यायांची निवड: ग्राहक अॅडव्हान्टेज, प्राईम आणि एलिट या पर्यायांमधून निवड करू शकतात; ज्यातील प्रत्येक पर्याय प्रीमियमचे स्वरूप आणि लाभाच्या पसंतीनुसार डिझाइन केलेला आहे.

सिंगल आणि जॉइंट लाईफ: हा प्लॅन सिंगल लाईफ आणि जॉइंट लाईफ पर्यायांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक लवचिकता प्रदान करतो. जॉइंट लाईफ पर्यायांतर्गत कोणत्याही एका विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वेव्हर ऑफ प्रीमियमची सुविधा मिळते, ज्यामुळे ग्राहकाच्या निवृत्तीच्या ध्येयाकडे जाणारा प्लॅन विनाअडथळा सुरू राहण्यास मदत होते.

गुंतवणुकीची निवड: तुमच्या रिस्क प्रोफाइल आणि निवृत्तीच्या ध्येयांशी जुळणारे ५ फंड्स आणि ४ गुंतवणूक धोरणांमधून निवड करा.

हर बेनिफिट: महिलांच्या विशिष्ट आर्थिक नियोजन गरजा ओळखून, हा प्लॅन पुरुष पॉलिसीधारकांच्या तुलनेत महिला पॉलिसीधारकांसाठी अधिक लाभ प्रदान करतो.

फंड बूस्टर्स: हा प्लॅन पॉलिसी कालावधीत प्रीमियम वाटप शुल्काच्या ६०० टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम फंड व्हॅल्यूमध्ये परत करतो, ६ व्या पॉलिसी वर्षापासून वार्षिक लॉयल्टी अॅडिशन्स जोडतो आणि व्हेस्टिंगच्या वेळी सरासरी फंड व्हॅल्यूच्या १ टक्‍क्‍यार्यंत अॅन्युइटी बूस्टर प्रदान करतो.

 

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. कमलेश राव म्हणाले, “आजच्या काळात निवृत्ती म्हणजे स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे आणि आत्मविश्वासाने आयुष्याचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य असणे होय. हे साध्य करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच विचारपूर्वक आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. एबीएसएलआय स्मार्ट वेल्थ पेन्शन प्लॅनद्वारे, ग्राहकांना त्यांच्या भविष्यातील ध्येयांना पाठबळ देणारा निवृत्ती निधी उभारण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता, पसंतीचे पर्याय आणि दीर्घकालीन लाभ प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

मॅच्युरिटीच्या वेळी, लागू नियमांच्या अधीन राहून, ग्राहक एकूण निधीपैकी ६० टक्‍क्‍यांपर्यंत करमुक्त रक्कम काढू शकतात, तर उर्वरित रक्कम अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरता येते. हा प्लॅन १८ ते ७५ वर्षे वयोगटातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्राहक एबीएसएलआयच्या देशभर पसरलेल्या वितरण जाळ्याद्वारे आणि ऑनलाइन चॅनेलद्वारे या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात. उत्पादनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा: ABSLI Smart Wealth Pension Plan | ULIP

Plan | ABSLI

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments