Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, पात्र विध्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन*

स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, पात्र विध्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. १६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नूतनीकरण अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

यापूर्वी नूतनीकरण अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आता ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

*अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा*

स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या आणि सन २०२६-२७ साठी अद्याप नूतनीकरण अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासाठी महाआयटीचे स्वाधार योजना वेब पोर्टल : http://hmasnew.mahait.org/ येथे भेट द्यावी.

 

पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी नूतनीकरण अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments