Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजगडावर 'आग्य्राहून सुटका स्मृतिदिन' उत्साहात साजरा पुणे महानगरपालिका व श्री शिवाजी...

राजगडावर ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ उत्साहात साजरा पुणे महानगरपालिका व श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन ; ३५७ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन किल्ले राजगड उत्सव – वर्षे ४३ वे

पुणे : किल्ले राजगड येथे पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर असा ढोल ताशांच्या गजरात निघालेला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा…मर्दानी खेळ …छत्रपती शिवरायांचा जयघोष … अशा उत्साही वातावरणात आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खुर्द येथील खंडोबाचा माळ व गडावरती थाटात साजरा करण्यात आला .

पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५७ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ‘किल्ले राजगड उत्सवा’ चे आयोजन करण्यात आले होते. वंश परंपरेने किल्लेदार सुर्यकांत भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन झाले. पाल दरवाज्यावर पालखीचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, संपत चरवड, समीर रुपदे, सतीश सोरटे, सुरेश परदेशी व शिवप्रेमी उपस्थित होते. जिल्हा चिकित्सक ग्रामीण रुग्णालय, पुणे .यांनी प्रथोमोपचार सेवा व रुग्ण वाहिका सेवा दिली. पुणे महानगरपालिका सायकल क्लब या उत्सवात मध्ये सहभागी झाला होता.

पालखीचे आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रवी रोकडे, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाल वेशभूषेत राजवीर पायगुडे, तसेच मंदार राजवाडे, विकास रोकडे हे मावळ्यांच्या वेशभूषेत होते.

उत्सवाच्या पूर्वसंध्येला किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हंडे महाराज यांच्या मठात मॉसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खंडोबा मालावर शिव पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी वेल्हा पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. वसंतराव प्रसादे, सुर्यकांत भोसले, संजय दापोडिकर, अरविंद महाराज, रोहिदास हंडे महाराज , इंदुबाई बापू शिर्के, बाळकृष्ण महाराज दसवडकर, ह.भ.प दिनकर वालगुडे, नाना शिर्के, अंकुश कुळे, अनंता रेणुसे, विठ्ठल दर्डिगे , दशरथ भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ दर्डिगे , रामभाऊ दर्डिगे, पांडुरंग दर्डिगे, रामचंद्र पोळ, शिवाजीराव पोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सायली गोडबोले-जोशी यांनी राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर केला. आग्र्याहून सुटका या विषयी व्याख्यात्यांची व्याख्याने झाली. यावेळी माधव जगताप, रणजीत पठारे यांनी गडावरील सुधारणा, सुविधा व सुरक्षा या बाबत आढावा घेतला. राजगडावरील पुणे महानगरपालिका यांच्या मदतीने पुनर्बांधणी करण्यात आलेल्या सदरेचा लवकर लोकार्पण सोहळा करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजक श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे वीरेंद्र सिंह ठाकूर, योगेंद्र भालेराव, मंगेश राव, अभिजित पायगुडे, पांडा मोरे, शशी रसाळ, निलेश बारावकर, गणेश बोरकर, संजय शेंडकर, सुनील तोंडे, सचिन गोळे, गुरुदत्त भागवत, अमोल व्यवहारे, निखिलेश ठाकूर, प्रशांत पायगुडे, अमित दारवटकर, सचिन यादव, अभिजित गोखले, मोहोन देढे, विवेक नाकोड, शुभम शिंदे, महेश कदम, सचिन पिसाळ, प्रमोद साबळे, प्रियंका दापोडीकर, समृध्दी कुलकर्णी, आत्मज हळंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन पहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments