मिया ऑन व्हील्स’सह प्रत्यक्षात साकारणार ब्रँडचा विचार – ‘प्रत्येक दिवस अनमोल’ (Precious, Every Day); ग्राहकांचा सणांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी खास ऑफर्स
पुणे, ९ ऑक्टोबर, २०२६: मिया बाए तनिष्क’ने शिवाजीनगरमधील जंगली महाराज रोडवर आपले नवे स्टोर सुरु करून पुणे शहरात आपले स्थान अधिक बळकट केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे ९५६ चौरस फुटांचे नवे स्टोर सुरु करण्यात आल्याने मिआच्या आधुनिक दागिन्यांचा अनुभव घेणे ग्राहकांसाठी अजून जास्त सहजसोपे झाले आहे. या स्टोरमध्ये आधुनिक व बहुमुखी डिझाइन्स उपलब्ध आहेत. या डिझाइन्स रोजच्या घटना, स्वतःला अभिव्यक्त करण्याची इच्छा आणि व्यक्तिगत शैली यांना ध्यानात ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.
स्टोरचे उद्घाटन टायटन कंपनी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अजोय चावला यांनी रिबन कापून आणि दीप प्रज्वलन करून केले. या प्रसंगी मिया बाए तनिष्कचे रिटेल हेड श्री. संजय भट्टाचार्जी देखील उपस्थित होते. या उदघाटनासोबतच पुण्यामध्ये मिआच्या फेस्टिव सीझनचा शुभारंभ झाला आहे.
शिवाजीनगरमध्ये मॉडर्न हायस्कुलजवळ, जंगली महाराज रोडवर, मोटवानी चेंबर्समध्ये (नंबर ११८७) असलेल्या या स्टोरमध्ये येणे ग्राहकांसाठी खूप सोयीचे आहे. याठिकाणी मियाच्या ‘ग्रँड नॉक्स’ बरोबरीनेच इतरही ज्वेलरी कलेक्शन्स उपलब्ध आहेत. स्टोरमध्ये कॅरेटमीटर लावण्यात आलेला आहे, त्यामुळे ग्राहक त्यांच्या सोन्याची शुद्धता स्वतः पारखू शकतात. यामुळे या स्टोरमध्ये ग्राहकांना खरेदीमध्ये अधिक जास्त पारदर्शकता व सुविधा मिळेल.
ग्राहकांचा आनंद फक्त स्टोरपुरता मर्यादित न ठेवता, मिया बाए तनिष्कने ‘मिया ऑन व्हील्स’ची सुरुवात केली आहे. हा एक चालता-फिरता अनुभवात्मक उपक्रम आहे. ब्रँडचा विचार ‘प्रत्येक दिवस अनमोल’ (Precious, Every Day) या उपक्रमातून ग्राहकांच्या घरांपर्यंत पोहोचवला जात आहे. अनीत पद्दासह ब्रँडने नुकत्याच केलेल्या कॅम्पेनपासून प्रेरणा घेऊन सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये क्रिस्टलने सजलेल्या गाड्यांचा एक ताफा शहरभर फिरून, महिलांना मजेशीर पोट्रेट्स, संवादात्मक अनुभव आणि स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या संधी देत स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी आमंत्रित करत आहे. सणासुदीच्या ठीक आधी सुरु करण्यात आलेला ‘मिया ऑन व्हील्स’ उपक्रम ब्रँडचा विश्वास मजबूत करतो – प्रत्येक महिला कोणत्याही खास प्रसंगाची वाट न पाहता, प्रत्येक दिवशी स्वतः अनमोल असल्याची जाणीव मिळवू शकते.
सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मिया बाए तनिष्क ११ ऑक्टोबरपासून फेस्टिव ऑफर्स सुरु करणार आहे. यामध्ये डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर १००%* पर्यंतची सूट दिली जाईल. ही ऑफर ग्राहकांना अशा दागिन्यांसह सण साजरा करण्याची संधी देईल, ज्यामध्ये त्यांचे अनोखेपण व व्यक्तिगत स्टाईल दोन्ही दर्शवलेले असेल.
टायटन कंपनी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अजोय चावला यांनी सांगितले, “पुणे मिया साठी एक प्रमुख आणि सातत्याने वाढत असलेली बाजारपेठ आहे. याठिकाणी नोकरपेशा व्यावसायिकांची संख्या मुबलक आहे, ज्यांना आधुनिक व ब्रँडेड ज्वेलरी खूप आवडते. जेएम रोडवर नवे मिया स्टोर शहरात आमचे ११वे स्टोर आहे, ग्राहकांना आमच्या स्टोरमध्ये येणे आता अधिकच सोपे झाले आहे. रोजच्या छोट्या-मोठ्या प्रसंगी स्वतःला अभिव्यक्त करू इच्छिणाऱ्या आणि स्टाईलप्रती जागरूक असलेल्या आधुनिक ग्राहकांच्या वैयक्तिक टप्प्यांचा आनंद साजरा करण्यासाठी मिआ सज्ज आहे.”
मिया बाए तनिष्कचे रिटेल हेड श्री. संजय भट्टाचार्जी म्हणाले, “जेएम रोडवर आमचे नवे स्टोर ग्राहकांना दागिने खरेदीचा आधुनिक व सुलभ अनुभव देण्याची मियाची कटिबद्धता दर्शवते. आमच्या ‘प्रत्येक दिवस, अनमोल’ (Precious, Every Day) या विचारासह आम्ही महिलांना स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नेहमीच्या क्षणांमध्ये आनंद शोधण्यासाठी प्रेरित करतो. मिया ऑन व्हील्स’ सारखे उपक्रम आणि आमच्या फेस्टिव ऑफर्समार्फत आम्ही संपूर्ण पुण्यामध्ये ग्राहकांसोबतचे नाते घनिष्ठ करण्यासाठी आणि यंदाचा फेस्टिव सीझन अधिक खास बनवण्यासाठी उत्सुक आहोत.”
या लाँचचा एक भाग म्हणून, मिया बाए तनिष्क ‘विंग्स फॉर ड्रीम्स’ च्या सहकार्याने एका सीएसआर उपक्रमाचे आयोजन करत आहे. यामध्ये रोजच्या प्रवासातील किंवा आयुष्यातील क्षणांना मौल्यवान बनवण्याच्या आपल्या विचारसरणीला ब्रँड प्रोत्साहन देईल. हा उपक्रम मिया स्टोअर्सना भेट देणाऱ्या ग्राहकांना देणगीच्या माध्यमातून दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याला मौल्यवान बनवण्यात योगदान देण्यासाठी आमंत्रित करतो. हा उपक्रम या सणासुदीच्या काळात उत्सव आणि दानशूरतेची
भावना एकत्र आणतो.


