Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेजुरी येथे १४ ऑक्टोबरला शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिर*

जेजुरी येथे १४ ऑक्टोबरला शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिर*

 

 

पुणे, दि.१३: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या कार्यक्षेत्रातील विविध शिबिरांच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्तीची वैधता संपत असल्याने पक्क्या अनुज्ञप्तीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या अर्जदारांना दिलासा देण्यासाठी जेजुरी येथे बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी अतिरिक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपत असलेल्या अर्जदारांना पक्क्या अनुज्ञप्तीसाठी नियोजित वेळेत उपस्थित राहता येत नसल्याबाबत कार्यालयाला निवेदने प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

या शिबिराचा लाभ शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपलेल्या अर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.याशिवाय वेल्हे, उरुळीकांचन, शिक्रापूर, पिरंगुट, शिरूर, जेजुरी व सासवड येथे पूर्वनियोजित शिबिरांमध्ये अतिरिक्त स्वरूपात २०० अपॉइंटमेंट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अपॉइंटमेंट १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उपलब्ध होतील.

शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपत आलेल्या अर्जदारांनी या सुविधेचा लाभ घेऊन पक्क्या अनुज्ञप्तीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments