पुणे, 16 ऑक्टोबर 2026: नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर मध्ये प्रगत होलोजिक ३डी मॅमोग्राफी सिस्टिमचे उद्घाटन करण्यात आले. स्तनाच्या कर्करोगाचे तपासणीद्वारे लवकर निदान अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अत्याधुनिक प्रणालीमध्ये उच्च-रिझोल्यूशन 3D ब्रेस्ट इमेजिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) -सहाय्यित सुविधा तसेच पोस्ट-कॉन्ट्रास्ट इमेजिंगचा समावेश असून,स्तनाच्या गाठी किंवा जखमांचे अधिक बारकाईने मूल्यांकन करण्यास डॉक्टरांना मदत होणार आहे. या प्रणालीचे उदघाटन नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर चे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने, समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे, ब्रेस्ट ऑन्को सर्जन डॉ.गिरिजा पाटील, रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. सागर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रगत प्रणालीमुळे स्तनाच्या ऊतींचे अधिक स्पष्ट आणि सविस्तर प्रतिमा दिण्यास,अगदी लहान गाठी ओळखण्यास आणि पुढील तपासणीची आवश्यकता असलेल्या रुग्णांचे अधिक अचूक मूल्यांकन करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
स्तनाचा कर्करोग अनेकदा स्तनात जाणवणारी गाठ किंवा इतर कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसण्यापूर्वीही अस्तित्वात असू शकतो. लवकर निदानाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अधिक सविस्तर इमेजिंगमुळे स्तनातील असामान्यता सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखणे आणि आवश्यक पुढील तपासण्या वेळेत नियोजित करणे डॉक्टरांना शक्य होईल.
यावेळी बोलताना नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. सागर कदम म्हणाले, “स्तनाच्या कर्करोगाच्या प्रभावी व्यवस्थापनात लवकर निदानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही प्रगत 3D मॅमोग्राफी प्रणाली स्तनात जाणवणारी गाठ किंवा कोणतीही स्पष्ट लक्षणे नसतानाही संभाव्य बाधित भाग सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखण्याची आमची क्षमता अधिक मजबूत करेल. उच्च-रिझोल्यूशन 3D इमेजिंग, AI-सहाय्यित सुविधा आणि पोस्ट-कॉन्ट्रास्ट इमेजिंगमुळे संशयास्पद भागांचे अधिक सखोल मूल्यांकन करण्यासाठी डॉक्टरांना अतिरिक्त माहिती मिळते आणि पुढील योग्य तपासणीबाबत निर्णय घेणे सुलभ होते.”
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्को सर्जन डॉ. गिरिजा पाटील म्हणाल्या, “स्तनातील असामान्यता शोधण्यासाठी मॅमोग्राफी ही एक महत्त्वाची तपासणी आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे काळजी करण्यासारखे रिपोर्ट्सचे अधिक सविस्तर मूल्यांकन करणे आणि पुढील तपासणीची आवश्यकता असलेल्या रुग्णांची ओळख करणे शक्य होईल. संभाव्य बाधित भाग आढळल्यास, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यकतेनुसार बायोप्सीसह पुढील तपासण्यांच्या माध्यमातून निदान निश्चित करता येते. वेळेवर तपासणी, अचूक मूल्यांकन आणि लवकर उपचार याबाबत जनजागृती करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
“नोबल हॉस्पिटल्समध्ये प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने आजारांचे लवकर निदान करणे आणि रुग्णांना अधिक प्रभावी उपचार उपलब्ध करून देणे, हे आमचे ध्येय आहे. एआय-सक्षम 3D मॅमोग्राफी प्रणालीची सुरुवात ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असे डॉ. दिलीप माने, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर यांनी सांगितले.
नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर चे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले, “स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान उपचारांच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण फरक घडवून आणू शकते. होलोजिक ३डी मॅमोग्राफी सिस्टिममुळे आमच्या निदान क्षमतांना अधिक बळ मिळणार असून, स्तनातील असामान्य भागांचे अधिक सविस्तर मूल्यांकन आणि वेळेवर, योग्य वैद्यकीय निर्णय घेणे शक्य होईल. नोबल हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासोबतच नियमित स्तन तपासणीच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही कटिब
द्ध आहोत.”


