Sunday, October 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशच्या वैभवशाली दुर्गापूजा महोत्सवास प्रारंभ

सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशच्या वैभवशाली दुर्गापूजा महोत्सवास प्रारंभ

 

 

पुणे, १८ ऑक्टोबर २०२६: बंगाली शैलीतील खास सजावट, फुलांची सजावट, बंगाली धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…अशा आनंदमय वातावरणात सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे शारदीय दुर्गा पूजा २०२६ महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. पुण्यातील साफा बँक्वेटस, बालेवाडी हायस्ट्रीट येथे २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरु असणाऱ्या या महोत्सवात ,पारंपरिक पद्धतीने होणारी दुर्गा पूजा, महाआरती, विविध रंगी भक्ती संगीत व नृत्य, कलाकारांचा नयन मनोहर अविष्कार तसेच भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम, पुष्पांजली, भक्तांसाठी रोज भोग व प्रसाद,सिंदूर खेला, विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शन आणि पारंपरिक बंगाली फूड फेस्टिवलचा समावेश आहे. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता पूजेला प्रारंभ होईल. दुपारी ३ वाजता सिंदूर खेला व त्यानंतर प्रतिमा निर्जन पार पडतील.

 

याप्रसंगी पारंपरिक बंगाली वेशभूषा करून भक्तांनी दुर्गादेवीसमोर केले जाणारे धूनुची हे भक्तिमय नृत्य सादर केले. यावेळी सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास , उपाध्यक्ष जॉयदीप चॅटर्जी , सरचिटणीस स्नेहा कुंडू व सौमित्र कुंडू आणि खजिनदार राज भनोट आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यंदा संस्थेच्या सामुदायिक दुर्गापूजा उत्सवाचे पाचवे वर्ष असून, या विशेष टप्प्याचे औचित्य साधून ‘मानुषेर माझे माँ’ अर्थात ‘माणसांमध्ये आई’ ही भावस्पर्शी संकल्पना निवडली आहे.या अभिनव महोत्सवात दैनंदिन दुर्गा पूजा विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक बंगाली फूड फेस्टिवल तसेच समुदायातील एकोपा, सांस्कृतिक परंपरा यांचे आगळे दर्शन घडत आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सकाळी ७.२० वाजता संधीपूजा, ७.५० वाजता बलिदान व दीपदान, १०.३० वाजता नवमी पूजा आणि ११.३० वाजता पुष्पांजली आयोजित करण्यात येईल. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दशमीपूर्व पूजेअंतर्गत सकाळी ८.३० वाजता कुमारी पूजा आणि ९ वाजता कुमारी भोग अर्पण करण्यात येईल. याशिवाय, उत्सवाच्या प्रत्येक सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यामुळे भाविकांना धार्मिक वातावरणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद घेता येईल.

 

या वर्षाची महोत्सवाची संकल्पना – ‘मानुषेर माझे माँ’ या संकल्पनेवर आधारित ही आहे. या दुर्गा पूजा महोत्सवात विविध रंगी भक्ती संगीत व नृत्य, कलाकारांचा नयन मनोहर अविष्कार तसेच भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तांसाठी रोज भोग व प्रसाद, विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शन, फूड कोर्ट आणि विविध संस्थांतर्फे अनेक प्रकारचे उपक्रम अशी खास आकर्षणे आहेत.संपूर्ण वातानुकूलित संकुल, व्हॅले पार्किंग, मोफत आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी व्हील चेअर सुविधा, 24 तास वैद्यकीय सहाय्यक यांची उपस्थिती यातून सप्तपदी असोसिएशनने हा दुर्गा पूजा महोत्सव सर्व सहभागी भाविकांसाठी कोणत्याही अडथळ्याविना व आनंददायकरित्या पार पाडेल अशी काळजी घेतली आहे. दररोज सकाळी विधीवत दुर्गा पुजा होणार असून त्यापाठोपाठ पुष्पांजली अन्य पारंपरिक पुजा विधी यांचा समावेश असणार आहे.या व्यतिरिक्त सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आनंद मेळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments