Sunday, October 18, 2026
Google search engine
HomeUncategorized*महायुतीच्या वतीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्याचे आयोजन; सोमवारी निगडी येथे...

*महायुतीच्या वतीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्याचे आयोजन; सोमवारी निगडी येथे बैठक**

 

 

**पिंपरी-चिंचवड, दि. १८ ऑक्टोबर २०२६ :**

 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार **डॉ. स्मिता योगेश जाधव व प्रा. कौस्तुभ मुरलीधर गावडे** यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने भव्य *पुणे पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्याचे* आयोजन करण्यात आले आहे.

 

या मेळाव्यास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री **मा. मुरलीधर आण्णा मोहोळ** तसेच महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष **मा. अण्णासाहेब बनसोडे** हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

 

या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवडचे महापौर **मा. रवी लांडगे**, आमदार **मा. महेश लांडगे**, **मा. शंकर जगताप**, माजी आमदार **मा. विलास लांडे**, विधानपरिषद आमदार **मा. उमा खापरे** व **मा. अमित गोरखे** यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांचे प्रमुख नेते, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

 

या मेळाव्याच्या माध्यमातून पदवीधर व शिक्षक मतदारांशी संवाद साधणे, निवडणुकीच्या प्रचाराची दिशा निश्चित करणे आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला गती देणे हा उद्देश आहे.

 

**बैठकीचा तपशील :**

 

* **दिनांक :** सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६

 

* **वेळ :** सायंकाळी ठीक ४:३० वाजता

 

* **स्थळ :** ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी-प्राधिकरण, पुणे

 

या मेळाव्यास महायुतीच्या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष **मा. योगेश मंगलसेन बहल** यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments