Monday, October 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिला सक्षमीकरणासाठी ‘एसएनडीटी’मध्ये मुलींना सॅनिटरी पॅड, पेपर स्प्रेचे...

महिला सक्षमीकरणासाठी ‘एसएनडीटी’मध्ये मुलींना सॅनिटरी पॅड, पेपर स्प्रेचे वाटप    

 

 

पुणे : मुलींचे आरोग्य, स्वच्छता आणि स्वयंसुरक्षा यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ संस्कृती आणि समाजसेविका मानसी ठाकूर यांच्या पुढाकारातून कर्वेनगर येथील एसएनडीटी महाविद्यालयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड, आणि पेपर स्प्रेचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे १५० विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

 

‘निरोगी मुलगी, आत्मविश्वासी उद्या’ आणि ‘सुरक्षा हा हक्क आहे, विशेषाधिकार नाही’ हा संदेश यावेळी देण्यात आला. या विशेष सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून कर्वेनगर येथील एसएनडीटी महाविद्यालयात सॅनिटरी पॅड वेंडिग मशीनही बसवण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आम्ही अनेक उपक्रम यापूर्वीही राबवले आहेत. त्याचा एक भाग म्हणून आज सँनिटरी पॅड्स वेडिंग मशीन, पेपर स्प्रेचे वाटप करण्यात आले आहे. आजच्या तरूणींनी निर्भयतेने, सक्षमपणे समाजात आपला ठसा उमटवावा, असे मत समाजसेविका मानसी ठाकूर यांनी व्यक्त केले. तर या वेंडिंग मशीनद्वारे विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गरजेच्या वेळी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड सहज मिळू शकतील, असे रोटरी क्लब ऑफ संस्कृतीच्या अध्यक्ष स्मिता कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, या कार्यक्रमाला एसएनडीटी कॉलेज होम सायन्स विभागाचे मुख्याध्यापक डॉ. गणेश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्याशिवाय उद्योजक निशिकांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती. तर रोटरी क्लबचे सचिव श्रीकांत खर्डेकर व सदस्य संजय कुलकर्णी , अथर्व जोशी यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments