Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिंदुजा हाउसिंग फायनान्स’कडून विवेक कन्नन यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

हिंदुजा हाउसिंग फायनान्स’कडून विवेक कन्नन यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

चेन्नई, ३० ऑक्टोबर २०२६ : ‘हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या ‘हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेड’ने (एचएचएफ) विवेक कन्नन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती दि. ३० ऑक्टोबर २०२६ पासून लागू होईल. विवेक कन्नन हे सचिन पिल्लई यांची जागा घेतील. सचिन पिल्लई हे ‘हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते २९ ऑक्टोबर २०२६ पासून ‘एचएचएफ’च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून पायउतार झाले आहेत. मात्र, ते ‘हिंदुजा हाउसिंग फायनान्स’च्या संचालक मंडळावर बिगर-कार्यकारी संचालक म्हणून काम करीत राहतील.

 

 

 

विवेक कन्नन हे २०२० मध्ये ‘हिंदुजा हाउसिंग फायनान्स’मध्ये मुख्य परिचालन अधिकारी म्हणून रुजू झाले होते. कंपनीची वाढ आणि परिवर्तन यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. कंपनीचा व्यवसाय आणि परिचालन क्षमता अधिक विकसित करण्यातही त्यांनी योगदान दिले आहे.

 

विवेक कन्नन यांना वित्तीय सेवा क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी मोतीलाल ओसवाल, डीएचएफएल, सिटीबँक, बार्कलेज आणि जीई कॅपिटल यांसारख्या संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातील विविध विभागांमध्ये काम केल्यामुळे त्यांना कर्ज व्यवसायाची आणि त्यातील बदलत्या घडामोडींची चांगली जाण आहे.

 

 

 

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विवेक हे कंपनीच्या एकूण व्यवसायाची कामगिरी, कर्जविषयक कामकाज, कर्जवसुली, परिचालन, जोखीम व्यवस्थापन, नियमांचे पालन आणि मनुष्यबळाशी संबंधित कामकाज पाहतील. कंपनीचा बाजारातील विस्तार वाढवणे आणि कामकाज अधिक सुरळीत करणे यावर त्यांचा भर असेल. घरांसाठी कर्ज घेण्याची सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवतानाच कंपनीची शाश्वत वाढ साधण्यावरही ते लक्ष केंद्रित करतील.

 

 

 

या नियुक्तीबाबत बोलताना ‘हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेड’चे अध्यक्ष धीरज जी. हिंदुजा म्हणाले, “२०२० मध्ये कंपनीत रुजू झाल्यापासून विवेक कन्नन हे ‘हिंदुजा हाउसिंग फायनान्स’च्या विकासाच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यांना या उद्योगाचा मोठा अनुभव आहे. व्यवसायाची चांगली समज आणि नेतृत्वगुणही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे कंपनीच्या पुढील विकासाच्या टप्प्याचे नेतृत्व करण्यासाठी ते योग्य आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुजा हाउसिंग फायनान्स आपली क्षमता आणखी वाढवेल. तसेच ग्राहक आणि भागधारकांना दीर्घकाळ लाभ मिळवून देईल, असा मला विश्वास आहे.”

 

 

 

संचालक मंडळाने सचिन पिल्लई यांच्या नेतृत्वाचे आणि कंपनीच्या वाढीसाठी व विकासासाठी दिलेल्या योगदानाचेही कौतुक केले. बिगर-कार्यकारी संचालक म्हणून ते यापुढेही कंपनीला मार्गदर्शन करतील. कंपनीच्या विकासाच्या पुढील टप्प्यात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments