Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorized*एचडीएफसी लाईफच्या ‘स्वाभिमान’ उपक्रमातून पुण्यात सामाजिक व पर्यावरणीय विकासाला चालना* ...

*एचडीएफसी लाईफच्या ‘स्वाभिमान’ उपक्रमातून पुण्यात सामाजिक व पर्यावरणीय विकासाला चालना* *पुणे सेंट्रलसह शहरात ‘सिटी फॉरेस्ट्स’द्वारे हरित क्षेत्राचा विस्तार* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना पूरक उपक्रम*

 

 

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाला प्राधान्य दिले जात असताना, एचडीएफसी लाईफच्या ‘स्वाभिमान’ या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमातून पुण्यासह राज्यात विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कंपनीने गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात २०.७३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, ४८ प्रकल्पांच्या माध्यमातून ३ लाख ४१ हजार १८० हून अधिक नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविला आहे. पुण्यातील शहरी हरित क्षेत्राचा विस्तार, शिक्षण आणि समुदाय विकासावर या उपक्रमांतर्गत विशेष भर देण्यात आला आहे.

 

*पुणे सेंट्रलसह शहरी हरित क्षेत्राच्या विस्ताराला चालना*

 

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एचडीएफसी लाईफच्या ‘सिटी फॉरेस्ट्स’ उपक्रमातून पुण्यासह मुंबई, वसई-विरार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे २५ शहरी वने आणि दोन घनदाट वने विकसित करण्यात आली आहेत. या माध्यमातून १०.४० लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रावर ९८ हजार ३८० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. शहरी भागातील हरित क्षेत्र वाढविणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि नागरिकांना पर्यावरणपूरक परिसर उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुणे सेंट्रलसह शहरातील हरित विकासाच्या प्रयत्नांना अशा उपक्रमांमुळे बळ मिळत आहे.

 

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला पूरक योगदान*

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासात पर्यावरणीय शाश्वतता, आधुनिक पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांना महत्त्व दिले आहे. शासनाच्या विकासाभिमुख धोरणांना पूरक ठरणाऱ्या खासगी क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांमधूनही स्थानिक पातळीवर सकारात्मक बदल घडविण्याची संधी निर्माण होत आहे. एचडीएफसी लाईफच्या ‘स्वाभिमान’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच शिक्षण, कौशल्यविकास, आरोग्य आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

*शिक्षण व उपजीविकेसाठी ७.८१ कोटींची गुंतवणूक*

 

शिक्षण आणि उपजीविका क्षेत्रात महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत २० कार्यक्रम राबविण्यात आले असून, त्यासाठी ७.८१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या उपक्रमांचा ४३ हजार ९४० हून अधिक नागरिकांना लाभ झाला आहे. पुणे, बारामती आणि इंदापूरसह मुंबई, लातूर, पालघर आणि नाशिक येथे अंगणवाडी व्यवस्था सुधारणे, शालेय पायाभूत सुविधा बळकट करणे, डिजिटल शिक्षण, विशेष गरजा असलेल्या मुलांना सहाय्य आणि आर्थिक साक्षरता वाढविण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे.

 

*आरोग्य व स्वच्छतेसाठी ६.४९ कोटींचा खर्च*

 

आरोग्यसेवा आणि स्वच्छता क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत १७ कार्यक्रम राबविण्यात आले असून, त्यासाठी ६.४९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथील २ लाख ६४ हजारांहून अधिक नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे. गरजू रुग्णांना आरोग्यसेवा, गंभीर आजारांनी ग्रस्त मुलांच्या शस्त्रक्रियांना सहाय्य, माता व बाल आरोग्य आणि आरोग्यविषयक जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. तसेच १,१०० घरगुती शौचालयांच्या उभारणीस सहाय्य करण्यात आले आहे.

 

*पर्यावरणीय उपक्रमांसाठी ६.४३ कोटी*

 

पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ६.४३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या अंतर्गत ११ कार्यक्रमांच्या माध्यमातून ३२ हजार ८०० हून अधिक नागरिकांपर्यंत लाभ पोहोचला आहे. मुंबई, ठाणे, नांदेड आणि चिपळूण येथील १० शाळांमध्ये २३०.४४ किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून, त्याचा १,४०० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. नागपूरजवळील साकोली येथील सेंदूरवाफा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठीही सहाय्य करण्यात आले आहे.

 

‘स्वाभिमान’ उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक विकास, आरोग्य सुविधा आणि रोजगाराभिमुख उपजीविकेच्या संधी यांची सांगड घालून महाराष्ट्रात शाश्वत सामाजिक विकासाला हातभार लावण्याचा एचडीएफसी लाईफचा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments