Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा

 

*पुणे जिल्ह्यातील १२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ७८.९४ कोटी रुपयांचा लाभ*

 

पुणे, दि. ४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आज ४.८७ लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येत आहे. यामुळे आजअखेर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ७८.९४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.

 

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने विकसित केलेल्या योजना पोर्टलवर बँकांकडून एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

 

महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रियेद्वारे तपासणी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार याद्यांमध्ये एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ आणि चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

 

यापूर्वी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५.८५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १३ हजार २७५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता आणखी ४.८७ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत आहेत.

 

अशा प्रकारे आतापर्यंत एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. पात्र शेतकरी लाभार्थी आणि त्यांना मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची विभाग व जिल्हानिहाय चौकशी यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments