पुणे, दि. ४ :
(प्रतिनिधी)
भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक, आद्य क्रांतिकारक क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची १८१ वी जयंती आज पुण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पुण्यातील संगमवाडी येथील “वासुदेव बळवंत फडके स्मारकास” फडके स्नेहवर्धिनी व रेल्वे पोलिस विभागाच्या वतीने सकाळी साडे दहा वाजता पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी रेल्वे पोलिस अधिकारी शिंदे,स्नेहवर्धिनी चे अध्यक्ष बंडोपंत फडके,दिगंबर गोपाळ फडके,दत्तात्रय लक्ष्मण फडके,चंद्रकांत दत्तात्रय फडके,चंद्रकांत प्रभाकर फडके,नंदकिशोर दत्तात्रेय फडके,श्रीकांत फडके,सुभाष फडके,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नंदकुमार कुलकर्णी व अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.
४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण येथे जन्मलेल्या फडके यांनी १८५७ च्या उठावानंतर खचलेल्या भारतीय मनात पुन्हा स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांनी १८७९ मध्ये पहिले गुप्त क्रांतिकारी संघटन स्थापन करून सशस्त्र लढ्याची घोषणा केली.
रामोशी,कोळी,भिल्ल,धनगर अशा सर्वसामान्य लढवय्या समाजाला एकत्र करून त्यांनी स्वराज्यासाठी सैन्य उभे केले. इंग्रज खजिन्यावर छापे टाकून क्रांतीसाठी निधी जमवला.”मी हिंदुस्थानचा सम्राट आहे” अशी घोषणा करून त्यांनी इंग्रज सरकारला थेट आव्हान दिले होते.
लोकमान्य टिळकांनी त्यांना “भारतीय क्रांतीचे जनक” म्हटले होते.त्यांचा त्याग,निष्ठा आणि देशभक्ती ही आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तरुणांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन देशासाठी कार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.


