Thursday, November 12, 2026
Google search engine
HomeUncategorized*मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत उद्योग व व्यावसायिक आस्थापनांनी सहभागी होण्याचे आवाहन*...

*मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत उद्योग व व्यावसायिक आस्थापनांनी सहभागी होण्याचे आवाहन* *युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याची संधी*

 

पुणे, दि. १२ : राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत युवकांना सहा महिन्यांचे प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उद्योग व व्यावसायिक आस्थापनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी केले आहे.

 

या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कालावधी ११ महिने असून, या कालावधीत उमेदवारांना शासनामार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात विद्यावेतन जमा करण्यात येईल. उमेदवारांना मिळणारे विद्यावेतन त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार निश्चित करण्यात आले आहे.

 

*उमेदवारांसाठी पात्रता*

उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल ३५ वर्षे असावे. शैक्षणिक पात्रता बारावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असावे.

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी व बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असावे.

 

*उद्योग व व्यावसायिक आस्थापनांसाठी पात्रता*

आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापनेची स्थापना किमान तीन वर्षांपूर्वी झालेली असावी.

आस्थापनेची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी), वस्तू व सेवा कर (जीएसटी), कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, उद्योग आधार तसेच उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाकडे (डीपीआयटी) नोंदणी असावी.

जिल्ह्यातील ज्या औद्योगिक आस्थापनांमध्ये २० पेक्षा अधिक कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीअंतर्गत कार्यरत आहेत, अशा पात्र आस्थापनांनी या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवून युवकांना प्रशिक्षणाची संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आस्थापनांनी (https://docs.google.com/forms/d/e/9FAIpQLSeHIUQ9hAtPYEYwOHkspMKvc/9UBWQfmr cDgJEgnk3AK_9zoQ/viewform?usp=dialog) भरून संमती द्यावी. योजनेच्या सविस्तर अटी, शर्ती, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया व मार्गदर्शक सूचना https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

योजनेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुक आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ अथवा श्री. अतिष मांडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments