Tuesday, November 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedविक्रम शिंदे छत्रपती शिवाजी महाराज युवा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

विक्रम शिंदे छत्रपती शिवाजी महाराज युवा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

 

 

पुणे, १७ नोव्हेंबर २०२६ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित, ७ वे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन भगवानगड, कंधार, नांदेड येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले. शिवाजी महाराजांचे व्यापक कार्य लोकाभिमुख व्हावे म्हणून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामध्ये शिवरायांचा आदर्श घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील सात नामवंत व्यक्तींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये युवा साहित्यिक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांना साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील रचनात्मक कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज युवा साहित्यरत्न हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते, उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे, कंधारचे माजी आमदार रोहिदास चव्हाण, कंधारचे नगराध्यक्ष शहाजीराजे नळगे, साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष व स्वागताध्यक्ष भास्कर गिते, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पालकर, संमेलन अध्यक्षा आरती झोटिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

विक्रम शिंदे यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे आहे. अनेक युवा तरूणांना साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात यशस्वी घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तसेच मराठी साहित्य आणि सामाजिक चळवळीतील त्यांच्या व्यापक योगदानाबद्दल या पुरस्काराने विक्रम शिंदे यांना गौरवण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि संमेलन आयोजक भास्कर गीते यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments