Tuesday, November 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेहनत आणि गुणवत्ता असूनही करिअरमध्ये प्रगती का होत नाही? कुबोटाचे माजी एमडी...

मेहनत आणि गुणवत्ता असूनही करिअरमध्ये प्रगती का होत नाही? कुबोटाचे माजी एमडी जी. एस. ग्रेवाल यांच्या नव्या पुस्तकातून उलगडली यशाची ११ अलिखित सूत्रे”

३६ वर्षांहून अधिक कॉर्पोरेट नेतृत्वाच्या अनुभवावर आधारित ‘The 11 Unwritten Rules of Career Growth’ हे पुस्तक व्यावसायिकांनाकरिअरमध्ये प्रगती करण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन करते.

 

पुणे, १६ नोव्हेंबर २०२६: ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशन (TMA) चे अध्यक्ष, एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे मुख्य सल्लागार आणि कुबोटाॲग्रिकल्चरल मशिनरी इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. ग्रेवाल यांचे ‘The 11 Unwritten Rules of Career Growth’ हे नवेपुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक आता ॲमेझॉनवर उपलब्ध आहे.

 

३६ वर्षांहून अधिक काळाच्या कॉर्पोरेट आणि नेतृत्व क्षेत्रातील अनुभवावर आधारित हे पुस्तक एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते. अनेक बुद्धिमान, मेहनती आणि कार्यक्षम व्यावसायिक आपल्या करिअरमध्ये अपेक्षित प्रगती का करू शकत नाहीत, तर काही जण सातत्याने पुढे कसे जातात?

 

ग्रेवाल यांच्या मते, करिअरमधील यश केवळ शैक्षणिक पात्रता, तांत्रिक कौशल्य किंवा कठोर परिश्रमांवर अवलंबून नसते. त्यासाठी काही अलिखितनियम महत्त्वाची भूमिका बजावतात. हे नियम महाविद्यालयांमध्ये शिकवले जात नाहीत किंवा नोकरीच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलेनसतात.

 

या पुस्तकात करिअरच्या प्रगतीशी संबंधित ११ महत्त्वाच्या सूत्रांची सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये सातत्यानेनवीन गोष्टी शिकणे, करिअरची स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे, तांत्रिक कौशल्यांपलीकडे स्वतःच्या क्षमता विकसित करणे, प्रभावी संवादकौशल्य,सकारात्मक दृष्टिकोन, बदल स्वीकारण्याची तयारी, कोचिंग आणि मार्गदर्शन, नावीन्यपूर्ण विचार, व्यावसायिक संबंध निर्माण करणे, कामाच्या ठिकाणीयोग्य वर्तन आणि स्वतःची व्यावसायिक ओळख निर्माण करणे यांचा समावेश आहे.

 

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ सैद्धांतिक सल्ले नसून लेखकाच्या प्रदीर्घ व्यावसायिक प्रवासातील प्रत्यक्ष अनुभव, नेतृत्वातील निरीक्षणेआणि वास्तविक उदाहरणांचा समावेश आहे. पुस्तकात दिलेली व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे आणि आत्मपरीक्षणासाठीचे उपक्रम वाचकांना स्वतःच्याक्षमता ओळखण्यास, सुधारणा करण्यास आणि करिअरच्या विकासाची जबाबदारी स्वतः स्वीकारण्यास मदत करतात.

 

पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणेबद्दल जी. एस. ग्रेवाल म्हणाले:“माझ्या प्रदीर्घ व्यावसायिक प्रवासात मला अनेक प्रतिभावान आणि मेहनतीव्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली. या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की केवळ उत्तम कामगिरी आणि तांत्रिक ज्ञान असूनही प्रत्येकालाकरिअरमध्ये अपेक्षित प्रगती करता येत नाही. सातत्याने शिकण्याची वृत्ती, प्रभावी संवाद, इतरांशी चांगले संबंध निर्माण करणे, आव्हानांकडे पाहण्याचादृष्टिकोन आणि मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला तयार करणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

 

या पुस्तकाच्या माध्यमातून मला असे अनुभव आणि शिकवण इतरांपर्यंत पोहोचवायची आहे, जी आपल्याला अनेकदा वर्षानुवर्षांच्या अनुभवातून आणिकधीकधी स्वतःच्या चुकांमधून मिळते. या पुस्तकामुळे काही व्यावसायिकांना जरी त्यांच्या करिअरमध्ये योग्य निर्णय घेण्यास मदत झाली, तरी माझाप्रयत्न सार्थकी लागेल.”

 

हे पुस्तक विशेषतः करिअरच्या सुरुवातीच्या आणि मधल्या टप्प्यात असलेल्या व्यावसायिकांसाठी, तरुण व्यवस्थापकांसाठी आणि भविष्यातनेतृत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.

 

पुस्तकात करिअरमधील यशाचा अर्थ केवळ पदोन्नती, उच्च पद किंवा अधिक वेतन एवढाच मर्यादित नसल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे. दीर्घकालीन यशासाठी क्षमता, चारित्र्य, विश्वासार्हता, चांगले संबंध आणि वैयक्तिक समाधान यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे लेखकानेस्पष्ट केले आहे.

 

लेखकाविषयी

 

जी. एस. ग्रेवाल हे सध्या ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशन (TMA) चे अध्यक्ष आणि एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे मुख्य सल्लागार आहेत. यापूर्वी त्यांनी कुबोटा ॲग्रिकल्चरल मशिनरी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच कुबोटा इंडियाच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेआहे.

 

ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रसामग्री उद्योगात त्यांना ३६ वर्षांहून अधिक अनुभव आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विक्री, विपणन, डीलर नेटवर्क विकास,ग्राहक सेवा आणि व्यवसाय व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

 

नेतृत्व विकास, कोचिंग आणि मेंटरिंग या विषयांमध्ये त्यांना विशेष रस आहे. ‘Leader as a Coach’ हे त्यांचे नेतृत्व विकासावर आधारित यापूर्वीप्रकाशित झालेले पुस्तक आहे.

 

पुस्तकाची माहिती

 

पुस्तकाचे नाव: The 11 Unwritten Rules of Career Growth

 

लेखक: जी. एस. ग्रेवाल

 

विषय: करिअर विकास, नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास

 

पृष्ठसंख्या: २७२

 

स्वरूप: पेपरबॅक

 

उपलब्धता: ॲमेझॉन इंडिया

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments