नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर २०२६: सलग २० वर्षे जगातील पहिल्या क्रमांकाची लुब्रिकंट पुरवठादार (क्लाइन) असलेल्या शेल लुब्रिकंट्सने आज भारतात शेल हेलिक्स, शेल ॲडव्हान्स आणि शेल रिमुला या ब्रँड्सअंतर्गत आपल्या नवीन सिंथेटिक लुब्रिकंट श्रेणीतील उत्पादने आणली.
आधुनिक वाहन तंत्रज्ञान आणि भारतीय वाहनांच्या परिस्थितीसाठी डिझाइन केलेली ही उत्पादने शेलच्या सिंथेटिक लुब्रिकंट तंत्रज्ञानाला भारतीय परिस्थितीसाठी चाचणी केलेल्या प्रगत जागतिक मानकांशी जोडतो जेणेकरून अधिक मूल्य, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि वाढीव संरक्षण मिळेल. इंधन बचत, सुरळीत कार्यप्रणाली, कमी देखभाल खर्च आणि इंजिनचे वाढलेले आयुष्य यांद्वारे ग्राहकांना प्रत्येक प्रवासाचा अधिक आनंद घेण्यास मदत करणे, हे या श्रेणीचे उद्दिष्ट आहे.
नवीन श्रेणीचे अनावरण करताना शेल ल्युब्रिकंट्स आणि राज पेट्रो स्पेशालिटीजच्या दक्षिण आशिया विभागप्रमुख देवांजली सेनगुप्ता म्हणाल्या: “भारत ही जागतिक स्तरावर शेल ल्युब्रिकंट्सच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे आणि भारतीय आफ्टरमार्केटसाठी आमची नवीन सिंथेटिक उत्पादन श्रेणी सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. आमची नवीन श्रेणी कठोर चाचणी, सखोल तांत्रिक कौशल्य आणि आमच्या ल्युब्रिकंट तंत्रज्ञानाच्या सीमा विस्तारण्याच्या अथक वचनबद्धतेचा परिणाम आहे. या नवीन पोर्टफोलिओद्वारे आम्ही संपूर्ण भारतातील जास्तीत जास्त ग्राहकांसाठी सिंथेटिक तंत्रज्ञान अधिक सुलभ करत आहोत. ग्राहकांच्या सखोल गरजांवर आधारित आमचा सुधारित मूल्याधारित पोर्टफोलिओ ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”
पुढील पिढीच्या सिंथेटिक उत्पादन श्रेमीत प्रवासी कार, मोटरसायकल आणि व्यावसायिक वाहनांमधील गतिशीलतेच्या विविध गरजांसाठी तयार केलेली चार उत्पादने समाविष्ट आहेत:
• शेल हेलिक्स एक्स्ट्रा एचएक्स८ ०डब्ल्यू-१६– आधुनिक आणि हायब्रीड पॉवरट्रेनसाठी तयार केलेले, पूर्णपणे सिंथेटिक, बीएस VI-अनुरूप प्रवासी कार इंजिन ऑइल. शेल अँटी-फ्रिक्शन टेक्नॉलॉजीने युक्त आणि नवीन एपीआय एसक्यू व आयएलएसएसी जीएफ-७बी मानकांची पूर्तता करणारे हे इंधन बचत आणि इंजिन संरक्षण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे चालकांना वर्षाला ४४० किमी¹ पर्यंत अधिक प्रवास करता येतो. ग्राहकांसाठी याचा अर्थ आहे कमी खर्च, इंजिनचा सुधारित प्रतिसाद आणि हायब्रीड पॉवरट्रेनसह आधुनिक इंजिने दीर्घकाळ संरक्षित राहतील हा विश्वास. हे उत्पादन १ लिटर आणि ३.५ लिटर पॅकमध्ये प्रति लिटर ८९४ रुपये एमआरपीवर उपलब्ध आहे.
• शेल एडव्हान्स एक्स्ट्रा एX७ – मध्यम वजनाच्या क्रूझर मोटरसायकलसाठी विकसित केलेले एक प्रीमियम पूर्णपणे सिंथेटिक मोटरसायकल ऑइल. स्मार्ट एफिशियन्सी टेक्नॉलॉजीसह हे ऑइल दैनंदिन प्रवासात आणि लांबच्या प्रवासात सुरळीत प्रतिसाद आणि सातत्यपूर्ण कामगिरी देण्यासाठी तयार केलेले आहे. त्यामुळे १५,००० किमीपर्यंत ऊर्जा ऱ्हास होत नाही. हे ०.८-लिटर, ०.९ लिटर, १ लिटर आणि २.५-लिटर पॅकमध्ये प्रति लिटर ७५६ रुपये एमआरपीवर उपलब्ध आहे.
• शेल एडव्हान्स एX६ – आधुनिक बीएस-VI मोटरसायकल आणि स्कूटरसाठी दैनंदिन प्रवास आणि रोजच्या शहरी राइडिंगसाठी डिझाइन केलेले एक पूर्णपणे सिंथेटिक मोटरसायकल आणि स्कूटर इंजिन ऑइल. हे ऑइल इंजिन, क्लच आणि गिअर्सना ३६०-डिग्री संरक्षण देते. तसेच ७१% पर्यंत इंजिनची स्वच्छता राखण्यास आणि प्रत्येक ठिकाणी थांबून चालणाऱ्या रहदारीच्या परिस्थितीत विश्वसनीय कामगिरी करण्यास मदत करते. त्यामुळे रायडर्सना त्यांच्या मोटरसायकलचे संरक्षण करता येते आणि रोजच्या शहरी प्रवासाचा अधिक सुरळीत आनंद घेता येतो. हे उत्पादन ०.६-लिटर, ०.८-लिटर, ०.९-लिटर आणि १-लिटर पॅकमध्ये प्रति लिटर ६०५ रुपये एमआरपीवर उपलब्ध आहे.
• शेल रिमुला आर४ प्लस सीके-४ – आधुनिक बीएस-६ व्यावसायिक वाहनांसाठी तयार केलेले सिंथेटिक तंत्रज्ञानाचे इंजिन ऑइल. आघाडीच्या ओईएमसोबत विकसित आणि चाचणी केलेले हे ऑइल इंजिनची टिकाऊपणा वाढवण्यास आणि १,२०,००० किमी⁴ पर्यंत ऑइल बदलण्याचा कालावधी वाढवण्यास मदत करते. त्यामुळे फ्लीट ऑपरेटर्सना देखभालीची कार्यक्षमता सुधारण्यास आणि वाहनांचा अपटाइम वाढवण्यास मदत होते. हे उत्पादन १-लिटर, ११-लिटर, १५-लिटर, १८-लिटर आणि २६-लिटर पॅकमध्ये प्रति लिटर ५९० रुपये एमआरपीवर उपलब्ध आहे.
वाहनांचे तंत्रज्ञान जसजसे विकसित होते तसतसे शेल अशा प्रगत लुब्रिकंट उपायांची उपलब्धता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ते चालक, प्रवासी आणि फ्लीट ऑपरेटर्सना कार्यप्रदर्शन, कार्यक्षमता आणि विश्वसनीयता सुधारण्यास मदत करतात. हे उत्पादन स्थानिक गरजांनुसार तयार केलेल्या जागतिक स्तरावरील प्रगत उपायांसह भारताच्या वेगाने बदलणाऱ्या गतिशीलतेच्या क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या शेलच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करते.


