Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिरुर लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती*

शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती*

 

पुणे, दि. २४: जिल्ह्यातील ३६-शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.

 

सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून कुमार सौरभ राज यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०४ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९६९९७४०७८७ आणि ईमेल आयडी genobs36shirur@gmail.com असा आहे.

 

निवडणूक निरीक्षक, शिरुर लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत भेटता येईल. अन्य वेळी ९४२३४११९३७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क अधिकारी यांच्यामार्फत भेटता येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments