Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआचार्य अत्रे रंगमंदिर - संत तुकाराम नगर मतदार जनजागृती अभियान

आचार्य अत्रे रंगमंदिर – संत तुकाराम नगर मतदार जनजागृती अभियान

 

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.आयुक्त श्री.शेखर सिंह, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.विजयकुमार खोराटे, सहा.आयुक्त श्री.अविनाश शिंदे, उपायुक्त श्री.अण्णा बोदडे, सहकार विभागाच्या श्रीम.शितल पाटील तसेच गृहनिर्माण सोसायटी व संस्था यांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील सर्व गृहनिर्माण सोसायटी व संस्था यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.

 

सदर कार्यक्रमावेळी मा. आयुक्तांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, या पथनाट्याद्वारे मनोरंजनात्त्मक प्रबोधन करण्यात आले व मतदान जागृती करण्यात आली.

 

सदर कार्यक्रमास २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री.राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले ते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments