Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंविधान हाच खरा राष्ट्रग्रंथ अरविंद शिंदे

संविधान हाच खरा राष्ट्रग्रंथ अरविंद शिंदे

 

 

भारताच्या संविधाना ने गेली 75 वर्ष भारतात लोकशाही आणि धर्म निरपेक्षता टिकवून ठेवली आहे त्यामुळे भारताचे संविधान हाच खरा राष्ट्रग्रंथ असून त्याच्या पुढे कोणताही ग्रंथ नाही आणि हाच राष्ट्रग्रंथ व घटना बदलण्याचे षडयंत्र आगामी काळात सत्तेच्या जोरावर भाजप करू पाहत आहे हे भाजपाचे कटू कारस्थान संविधान प्रेमी नागरिकांनी हाणून पडल पाहिजे व येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकित काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट च्या अधिकृत उमेदवार यांना भरघोस मतदान करून भाजपाचा पराभव घडवीला पाहिजे असे उद्गार पुणे शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले निमित्त होते

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज काँग्रेस भवन शिवाजीनगर नगर येथे महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे पुणे लोकसभा उमेदवार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या प्रचारार्थ नियोजना साठी अनुसूचित विभागाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी पुणे शहरातील विविध भागात कॉर्नर बैठका, संविधान बचाव फेरी या माध्यमातून तसेच घरोघरी जाऊन रवींद्रभाऊ धंगेकर यांचा प्रचार करण्याचे या बैठकीत ठरले, सदर बैठकीला प्रदेश काँग्रेस चे सचिव गौतम अरकडे, प्रदेश अनुसूचित विभागाचे सरचिटणीस कवीराज संघेलिया,अजित दरेकर माजी नगरसेवक,प्रदेश काँग्रेस चे प्रतिनिधी मेहबूब नदाफ, राहुल तायडे आदींनी आपले विचार व्यक्त केले या वेळी बैठकीस अजय खुडे, द. स पोळेकर, सुनील काळोखे, सुनील थोरात रवी आरडे, मुन्ना खंडेलवाल,अरविंद जाधव,गुलामहुसेन खान, कसबा ब्लॉक अध्यक्ष अनिल जाधव, वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष अमर मंडलिक, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष सनी कांबळे, शहर उपाध्यक्ष यश कांबळे, अरविंद जाधव, विनोद चौरे, सुरज कसबे, राजेश दांडगे, प्रभाकर भिंगारे, शाम गायकवाड गणेश कांबळे, निखिल चौरे, संतोष हंगरगी, राकेश माने या सह शहरातील विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते या वेळी काही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शहर अनुसूचित जाती विभाग अंतर्गत व भवानी ब्लॉक अंतर्गत शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे व उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले या बैठकीचे आभार प्रदर्शन अमर मंडलिक यांनी केले तर सदर बैठकीचे आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष तथा भवानी ब्लॉक चे अध्यक्ष सुजित यादव यांनी केले होते

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments