नवी दिल्ली, भारत, 25 एप्रिल 2024 – फिनटेक उद्योगातील भारतातील अग्रणी, भारतपे ने, आज पीओएस, क्यूआर आणि स्पीकरला एकाच डिव्हाइसमध्ये एकत्रित करणारे भारतातील पहिले ऑल-इन-वन पेमेंट उत्पादन भारतपे वन लाँच करण्याची घोषणा केली. डायनॅमिक आणि स्टॅटिक क्यूआर कोड, टॅप-अँड-पे आणि पारंपारिक कार्ड पेमेंट पर्यायांसह, डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सच्या विस्तृत श्रेणीसह अष्टपैलू पेमेंट स्वीकृती पर्याय ऑफर करून, व्यापाऱ्यांसाठी व्यवहार सुलभ करण्यासाठी हे नवीन उत्पादन डिझाइन केले आहे. पहिल्या टप्प्यात 100 हून अधिक शहरांमध्ये उत्पादन लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. पुढील 6 महिन्यांत 450 हून अधिक शहरांमध्ये याचा विस्तार केला जाईल.
रिअल-टाइम ट्रान्झॅक्शन अपडेट्स आणि इन्स्टंट व्हॉइस पेमेंट कन्फर्मेशनसह, भारतपे वन रिटेल स्टोअर्समधील पेमेंटचा अनुभव पुढील स्तरावर घेऊन जाईल. हे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही एक सोपा आणि त्रासमुक्त अनुभव देते. हाय-डेफिनिशन टचस्क्रीन डिस्प्ले, 4G आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आणि लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमद्वारे समर्थित, भारतपे वन उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि सुरक्षा देते. यूजर्स-अनुकूल इंटरफेस, पोर्टेबल डिझाइन आणि सर्वसमावेशक व्यवहार डॅशबोर्डसह, भारतपे वन ऑफलाइन व्यापाऱ्यांच्या विविध गरजा पूर्ण करते.
नलिन नेगी, सीईओ, भारतपे, म्हणाले, “भारतपी वन सोबत, आम्ही आणखी एक डिसरप्टिव्ह उत्पादन आणले आहे जे डिजिटल पेमेंट पाहण्याचा पाहण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणेल. देशभरातील लाखो ऑफलाइन व्यापाऱ्यांसाठी कार्यक्षमता आणि सुविधा वाढवतील. एका किफायतशीर डिव्हाइसमध्ये अनेक कार्यक्षमतेचे संयोजन करून, आम्ही विविध क्षेत्रातील लहान आणि मध्यम व्यवसायांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक उपाय प्रदान करत आहोत. भारतपे ही व्यापारी-प्रथम कंपनी आहे आणि हे अत्याधुनिक डिव्हाइस ऑफलाइन व्यापाऱ्यांसाठी पसंतीचे भागीदार बनण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते, मूल्य वितरीत करते आणि त्यांच्या व्यवसायात वाढ करते.”
राजीश राघवन, चीफ बिजनेस ऑफिसर – पीओएस सोल्युशन्स, भारतपे, म्हणाले, “भारतपे वन हे आमच्या व्यापारी भागीदारांना एकात्मिक आणि सुरळीत पेमेंट अनुभव देण्यासाठी ‘वन-स्टॉप डिव्हाइस’ म्हणून डिझाइन केले आहे. मला विश्वास आहे की भारतातील हे पहिले ऑल-इन-वन पेमेंट डिव्हाईस व्यापाऱ्यांना अधिक चांगला ग्राहक अनुभव सुनिश्चित करण्यात मदत करेल, ज्यामुळे ग्राहकांना आनंद मिळेल. प्रायोगिक टप्प्यात आम्हाला आमच्या व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की डिजिटल पेमेंट इकोसिस्टमसाठी हे आणखी एक गेम चेंजर ठरेल, ज्यामुळे फिनटेक उद्योगातील एक अग्रणी म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत होईल.
भारत पे बद्दल.
भारतपे (रेसिलियंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ब्रँड नाव) ची स्थापना 2018 मध्ये भारतीय व्यापाऱ्यांसाठी आर्थिक समावेशना प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने करण्यात आली. 2018 मध्ये, भारतपे ने भारतातील पहिला यूपीआय इंटरऑपरेबल क्यूआर कोड, पहिली शून्य एमडीआर पेमेंट स्वीकृती सेवा लाँच केली. 2020 मध्ये, कोविड नंतर, कंपनीने एक कार्ड स्वीकृती टर्मिनल भारतपे स्वाइप देखील लॉन्च केले. सध्या, त्याचे 450 हून अधिक शहरांमध्ये 1.3 कोटी पेक्षा जास्त व्यापाऱ्यांचे मजबूत नेटवर्क आहे, आणि 370 दशलक्ष पेक्षा जास्त यूपीआय व्यवहार पार पाडणारे यूपीआय ऑफलाइन व्यवहारातील एक प्रमुख आहे. भारतपे 1.7 लाख कोटी रुपयांच्या वार्षिक व्यवहार मूल्यासह पेमेंट प्रक्रिया करते. भारतपे मनी (रेझिलिएंट डिजी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ब्रँड नाव), एक भारतपे ग्रुप कंपनीने यापूर्वीच एनबीएफसी सह भागीदारीत 14,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वाटपाची सोय केली आहे. भारतपे चे स्वाइप बिझनेस त्याच्या मशीनवर वार्षिक 29,000 कोटी रुपयांच्या पेमेंटवर प्रक्रिया करतो. भारतपे ने आजपर्यंत US$583 दशलक्ष पेक्षा जास्त इक्विटी जमा केली आहे. कंपनीच्या प्रमुख गुंतवणूकदारांच्या यादीमध्ये पीक XV पार्टनर्स (पूर्वी सेक्वॉया कॅपिटल इंडिया म्हणून ओळखले जाणारे) रिबिट कॅपिटल, इनसाइट पार्टनर्स, अँप्लो, बीनेक्स्ट, कोट्यू मॅनेजमेंट, ड्रॅगोनियर इन्व्हेस्टमेंट ग्रुप, स्टेडफास्ट कॅपिटल, स्टेडव्ह्यू कॅपिटल आणि टायगर ग्लोबल यांचा समावेश आहे. जून 2021 मध्ये, कंपनीने 120 दशलक्ष सदस्यांसह देशातील सर्वात मोठी मल्टी-ब्रँड लॉयल्टी प्रोग्राम कंपनी पेबॅक इंडिया (2023 मध्ये झिलियनमध्ये पुनर्ब्रँड केलेले) संपादन करण्याची घोषणा केली. ऑक्टोबर 2021 मध्ये, सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (सेंट्रम) आणि भारतपे यांच्या संघाला भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) द्वारे स्मॉल फायनान्स बँक (एसएफबी) परवाना जारी करण्यात आला. भारतपेने ऑक्टोबर 2021 मध्ये पोस्टपे लाँच करून ग्राहक फिनटेक विभागातही प्रवेश केला. आज, पोस्टपे कडे 15 दशलक्ष डाउनलोड आहेत. जानेवारी 2023 मध्ये, भारतपे ग्रुप कंपनी रेझिलिएंट पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) कडून तत्वतः मान्यता मिळाली. भारतपे आरबीआय कडे नोंदणीकृत प्रसिद्ध एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनी) ट्रिलियन लोन्स चे प्रवर्तक देखील आहे. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या- https://bhartpe
.com/


