Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून गुवाहाटीमध्‍ये नवीन व्‍यावसायिक वाहन स्‍पेअर पार्टस् वेअरहाऊसचे उद्घाटन

टाटा मोटर्सकडून गुवाहाटीमध्‍ये नवीन व्‍यावसायिक वाहन स्‍पेअर पार्टस् वेअरहाऊसचे उद्घाटन

गुवाहाटी, २६ एप्रिल २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज गुवाहाटीमध्‍ये नवीन व्‍यावसायिक वाहन स्‍पेअर पार्टस् वेअरहाऊसच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. ही अत्‍याधुनिक फॅसिलिटी पूर्णत: डिजिटलाइज आहे आणि १ लाख चौरस फूट जागेवर पसरलेली आहे. या फॅसिलिटीमध्‍ये संपूर्ण व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओसाठी स्‍पेअर पार्टसचा साठा आहे. लाँच करण्‍यात आलेली नवीन फॅसिलिटी कंपनीला टर्नअराऊंड वेळ जलद करण्‍यास आणि ईशान्‍येकडील टाटा ऑथोराईज्‍ड सर्विस स्‍टेशन्‍समध्‍ये स्‍पेअर्स सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍यास सक्षम करेल.

 

जागतिक दर्जाच्‍या पायाभूत सुविधा व सुरक्षिता उपायांसह सुसज्‍ज असलेली ही फॅसिलिटी डिजिटलाइज्‍ड वेअरहाऊस प्रक्रियांच्‍या माध्‍यमातून उत्तम ग्राहक मूल्‍य तत्त्व अनलॉक करेल. टाटा मोटर्सने तंत्रज्ञान-सक्षम वेअरहाऊसिंग व परिवहन सोल्‍यूशन्‍सचा फायदा घेण्‍यासाठी भारतातील सर्वात मोठी पूर्णत: एकीकृत लॉजिस्टिक्‍स सेवा प्रदाता डेल्हिव्‍हरी (Delhivery) सोबत सहयोग केला आहे. या केंद्रामध्‍ये विविध गरजांची पूर्तता करणाऱ्या अत्‍याधुनिक स्‍टोरेज सिस्‍टम्‍स, तसेच ग्रॅव्हिटी स्‍पायरल व व्‍हर्टिकल रेसिप्रोकेटिंग कन्‍वेयर्स आहेत. तसेच मध्‍यम व हेवी वेईकल बॉडी पार्टसच्‍या हाताळणीसाठी नियुक्‍त क्षेत्राचा समावेश करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून विनासायास कार्यसंचालनांची खात्री मिळते.

 

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या स्‍पेअर्स अँड नॉन वेईक्‍युलर बिझनेसचे प्रमुख श्री. विक्रम अग्रवाल म्‍हणाले, ”गुवाहाटीमध्‍ये उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या नवीन वेअरहाऊसमधून टाटा मोटर्सचा ग्राहक-केंद्रित्‍वाप्रती दृष्टीकोन दिसून येतो आणि हे वेअरहाऊस स्‍पेअर्सच्‍या सुलभ उपलब्‍धतेची खात्री घेत वाहन मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित करेल. नवीन वेअरहाऊस प्रांतामधील टाटा ऑथोराईज्‍ड सर्विस स्‍टेशन्‍समध्‍ये स्‍मार्टर इन्‍व्‍हेण्‍टरी व्‍यवस्थापन सक्षम करेल, ज्‍याद्वारे सेवा दर्जा व वेईकल अपटाइममध्‍ये सुधारणा होईल. हे नवीन केंद्र आम्‍हाला ईशान्‍येकडील जलदगतीने प्रगती करणाऱ्या प्रांतामधील ग्राहकांच्‍या समीप नेते आणि लॉजिस्टिक्‍स अधिक कार्यक्षम करते.”

 

टाटा मोटर्स सब १-टन ते ५५ टन कार्गो वाहनांची आणि १०-सीटर ते ५१-सीटर मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते, ज्‍यामध्‍ये लॉजिस्टिक्‍स आणि मास मोबिलिटी विभागांच्‍या विकसित होत असलेल्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी लहान व्‍यावसायिक वाहने व पिकअप्‍स, ट्रक्‍स आणि बसेस विभागांचा समावेश आहे. कंपनी आपल्‍या २५०० हून अधिक टचपॉइण्‍ट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कच्‍या माध्‍यमातून अद्वितीय दर्जा आणि सेवा कटिबद्धतेची खात्री देते. या नेटवर्कचे कार्यसंचालन प्रशिक्षित स्‍पेशालिस्‍ट्सकडून पाहिले जाते आणि टाटा जेन्‍यूएन पार्टसचे पाठबळ

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments