Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेईएम हॉस्पिटल रिसर्च सेंट पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड तर्फे...

केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंट पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड तर्फे वढु बुद्रुक येथे हेल्थ एटीएम प्रकल्पाचे उद्घाटन

पुणे,26 एप्रिल 2024 : केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वढु बुद्रुक येथे हेल्थ एटीएम प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ.लैला गार्डा,केईएम हॉस्पिटलच्या वढु रूरल हेल्थ प्रोग्रामचे प्रमुख डॉ.आनंद कवडे,रोटरी डिस्ट्रीक्ट 3131च्या प्रांतपाल मंजू फडके,रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे अध्यक्ष सुधीर बापट,सचिव वैशाली देव,उज्वल केले आणि अनिल कासोडेकर यांच्यासह केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.गिरीश दायमा,डॉ.ऋतुजा पाटील,डॉ.धीरज अगरवाल आणि डॉ.आदिती आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेल्थ एटीएम हे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लि.(एचएएल) तर्फे आरोग्य संबंधित माहिती व्यवस्थापित करण्यासाठी तयार केलेले टच – स्क्रीन किऑस्क आहे. हे क्लाऊड आधारित क्लिनिक असून स्वयंचलित आरोग्य तपासणी व त्वरित निदान अहवाल शक्य होते. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची माहिती ऑनलाईन संकलित करता येते.

या प्रकल्पाचा उद्देश्य ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी अ‍ॅनिमिया,मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या तपासण्या व्यापक स्तरावर उपलब्ध करून देणे,तसेच टेलिमेडिसिन सेवा प्रदान करणे हे आहे.सध्या रोटरीने सुमारे 30,000 लोकांची रक्तातील साखर आणि हिमोग्लोबीन तपासण्या करण्यासाठी प्रकल्पाला निधी दिला आहे.

तपासण्या करून घेणार्‍या व्यक्तीला या अ‍ॅप्लिकेशनवर उभे राहून आपला मोबाईल क्रमांक नोंदवून चाचण्या करता येतात. लोकांच्या मदतीसाठी सध्या एक तंत्रज्ञ उपलब्ध असेल. सुमारे महिनाभरात केईएमच्या मंचर येथील कम्युनिटी हेल्थ रिसर्च युनिटमध्ये या प्रकल्पाचा विस्तार केला जाईल. जिथे निदान व आरोग्य सेवा प्रदान करणार्‍या तज्ञांची उपलब्धता हे आव्हान आहे,अशा ग्रामीण भागात हा प्रकल्प उपयुक्त

ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments