Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा

पुणे,२६ एप्रिल २०२४ : अभिनवता आणि सर्जनशीलतेमध्ये बौद्धिक संपदेच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी,पुणे कॅम्पसने २६ एप्रिल २०२४ रोजी २६ आयपीआर आणि पेटंटसाठी अर्ज दाखल करून जागतिक बौद्धिक संपदा दिन एका विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा केला. आयपी अँड एसडीजी : बिल्डिंग अवर कॉमन फ्युचर विथ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी’ यावर्षीच्या संकल्पनेशी सुसंगत अशी कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. या कार्यक्रमाकरिता सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयु) प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, एआयसी-सीड, आयसर, पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता उत्तम यांनी आधुनिक काळात आयपीआरची भूमिका व महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.

 

जागतिक बौध्दिक संपदा दिवस हा दरवर्षी 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि यानिमित्त बौध्दिक संपदा संरक्षणाचे महत्त्व आणि त्याचे अभिनवता आणि सर्जनशीलतेमध्ये असलेले महत्त्व अधोरेखित केले जाते. आयपी धारकांचे हक्क तसेच सामाजिक कल्याण व सार्वजनिक हितासाठी त्यांची भूमिका विचारात घेणार्‍या समतोल दृष्टीकोनाच्या गरजेबद्दल जागरूकता वाढविण्याचा हा एक प्रसंग आहे.

याप्रसंगी एआयसी-सीड,आयसर, पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता उत्तम म्हणाल्या की, बुद्धिमत्तेकडून संपदेपर्यंतचा मार्ग हा आयपीआर आणि उद्योजकता यासारख्या अनेक टप्प्यांतून जातो.आपल्या देशाची 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षांपेक्षा कमी वयाची असून, आपण त्यांच्या सर्जनशील क्षमतेचा उपयोग केला पाहिजे आणि बदल घडवून आणण्यासाठी व अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नवकल्पना आणि स्टार्टअप्सना समर्थन देणे गरजेचे आहे.

 

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयु) प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, उद्योगाच्या वास्तविक समस्यांवर आपण काम करू शकलो तर, आपली निर्मिती आणि नवकल्पना प्रभावी बनविण्याची अधिक चांगली संधी आहे. आमच्या स्किल्स युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या नवकल्पना प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्याची संधी आहे. या उद्देशानेच आम्ही इन्क्युबेशन सेंटरची स्थापना केली. येथे नवकल्पनांवर चर्चा केली जाऊ शकते आणि नाविन्यपूर्ण सोल्युशन्स विकसित केले जाऊ शकतात, कॉलेजचा काळ यासाठी सर्वोत्तम आहे.

 

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे च्या आयपीआर विभागाच्या प्रमुख डॉ.खुशबू भुरत यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नवोपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की स्किल्स युनिव्हर्सिटी असल्याने विद्यार्थ्यांकडे अनेक नाविन्यपूर्ण कल्पना आहेत आणि स्वाभाविकपणे स्वतःच्या कंपन्या सुरू करण्याकडे त्यांचा कल आहे. विद्यापीठाने अशा कल्पनांना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार केले आहे.

 

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सिंबायोसिस स्कील्स अ‍ॅन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे च्या आयपीआर धोरणाचे अनावरण करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी किंवा प्राध्यापकांच्या कोणत्याही नवकल्पनांचे संरक्षण,अंमलबजावणी, प्रक्रिया इत्यादीबद्दल संपूर्ण माहिती यात समाविष्ट करण्यात आली आहे. याचा मसुदा कायदेतज्ञांच्या टीमने तसेच सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे च्या व्यवस्थापन आणि प्राध्यपकांच्या टीमने तयार केला आहे.

 

या कार्यक्रमामध्ये पेटंट,कॉपीराईट किंवा नॉवेल डिझाईन्सच्या स्वरूपात आयपीआर दाखल करण्यात रस दाखविणार्‍या सुमारे ६७ विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी त्यांनी तयार केलेला आशय सादर केला असून त्याच्या तपासणीनंतर आयपीआरची प्रक्रिया केली जाईल.

 

26 एप्रिल रोजी असलेल्या जागतिक बौध्दिक संपदा दिनानिमित्त सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने 26 कॉपीराईटस आणि डिझाईन्स साठी अर्ज केल्याची घोषणा केली आहे.हे कॉपीराईटस व डिझाईन विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दाखल केले असून प्रामुख्याने तंत्रज्ञान,आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्राती

ल आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments