Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेत माहे एप्रिल २०२४ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या १९ कर्मचा-यांचा सत्कारन

पिंपरी -चिंचवड महापालिकेत माहे एप्रिल २०२४ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या १९ कर्मचा-यांचा सत्कारन

पिंपरी, दि.३० एप्रिल २०२४ :- आज सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना निवृत्ती वेतनाबरोबरच विविध आर्थिक लाभ मिळणारच आहेत, या व्यतिरिक्त सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना विशेषत: वृद्ध आई वडिलांनाही वेळ द्यावा आणि आनंदी जीवन जगावे. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सह आयुक्त इंदलकर यांच्या हस्ते माहे एप्रिल २०२४ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या १९ कर्मचा-यांचा सेवानिवृत्तीनिमित्त स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, कर्मचारी महासंघाचे बालाजी आयंगार , विजया कांबळे, नथा माथेरे तसेच संजय जगदाळे आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

 

आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उप अभियंता देवेंद्र हनुमंतराव बोरावके, विद्युत विभागाचे उपअभियंता सुनिल भालेराव, कार्यालयीन अधीक्षक शोभा किरवे, मुख्याध्यापिका अलका बावळे, भारती यादव , कल्पना गव्हाणे , मुख्य लिपिक रमेश सूर्यवंशी , वायरलेस ऑपरेटर विनायक शेवतीकर, ए.एन.एम. लता जगताप, सिस्टर इनचार्ज शोभा माने , पद्मिनी फ्रान्सिस, वाहनचालक संजय कु-हाडे, मुकादम ज्ञानेश्वर डामसे, मजूर रविंद्र अहिराव, दत्तू भिसे, पांडुरंग दांगट, शिपाई विजय म्हस्के , सफाई कामगार संपत कांबळे, सफाई सेवक संतराबाई चंन्नाल यांचा समावेश होता.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments