Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ्लिपकार्टने विक्रेत्यांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आणली नवीन सुलभ रेट कार्ड योजना

फ्लिपकार्टने विक्रेत्यांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आणली नवीन सुलभ रेट कार्ड योजना

सुलभ रेट कार्ड योजनेचा व्यवसायाची वाढ करणे, प्लॅटफ़ॉर्मवर स्पर्धात्मक वृत्ती वाढवणे आणि प्लॅटफॉर्म विक्रेत्यांना सेटलमेंट क्लॅरिटी यावी हा उद्देश आहे.

सुलभ रेट कार्ड योजनेमुळे, नवीन शिपिंग कॉस्ट आणि आर्थिक सोयीचे फुलफिलमेंट बाय फ्लिपकार्ट च्या दरांमुळे विक्रेते ग्राहकांच्या सेवेत आणखी मोलाची भर घालू शकतील

बंगळुरू १० मे २०२४- फ्लिपकार्टने एक नवीन सुलभ रेट कार्ड योजना आणली आहे. या योजनेचा फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांच्या अनुभवांमध्ये क्रांती घडवणे आणि सेटलमेंट क्लॅरिटीत वाढ करणे हा उद्देश आहे.

हे नवीन रेट कार्ड १८ मे २०२४ पासून लागू होणार आहे. त्यात रेट कार्ड सुलभ करण्यात आले आहेत. फुलफिलमेंट बाय फ्लिपकार्टचे दर माफक आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार करताना स्पर्धात्मक वातावरण तयार होईल. नवीन शिपिंग धोरणामुळे विक्रेते ग्राहकांच्या अनुभवात मोलाची भर घालू शकतील. सुलभ रेट कार्ड योजनेमुळे एक मोठा बदल होईल आणि त्यामुळे व्यवसायाच्या वाढीला संधी मिळेल. तसंच विक्रेत्यांच्या सक्षमीकरणाच्या फ्लिपकार्टच्या धोरणालाही चालना मिळेल.

हा बदल समजावून सांगण्यासाठी तसेच त्याचे फायदे आणि परिणाम विक्रेत्यांना समजावून सांगण्यासाठी एक योजना आखण्यात आली आहे. या नवीन रेट कार्डाचे फायदे आणि मार्गदर्शन फ्लिपकार्ट रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे. फ्लिपकार्टची सेलर सपोर्ट टीम विक्रेत्यांना याबाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करत राहील. माहितीपूर्ण स्रोत आणि सपोर्ट चॅनल्सच्या माध्यमातून विक्रेत्यांना सर्व बदल समजावून सांगणे आणि त्या फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक यश मिळवण्यासाठी विक्रेत्यांनी योग्य निर्णय घ्यावेत हा फ्लिपकार्टचा उद्देश आहे.

या योजनेबद्दल बोलताना फ्लिपकार्टच्या मार्केटप्लेसचे उपाध्यक्ष आणि प्रमुख राकेश कृष्णन म्हणाले, “इ कॉमर्स कंपनी म्हणून या क्षेत्रात वेगवेगळ्या बदलांना सामोरे जाणे विक्रेत्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते याची आम्हाला जाणीव आहे. हे बदल म्हणजे आमच्या विक्रेत्यांबरोबर आमच्या सुरू असलेल्या संवादाचं प्रतिबिंब आहे. फ्लिपकार्टवर व्यापार करणं ही सोपी प्रकिया व्हावी हाच आमचा उद्देश आहे. रेट कार्डाची पुर्नरचना हा विक्रेत्यांचा व्यवसायाचे सुलभीकरण आणि त्यांना पाठिंबा या फ्लिपकार्टच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. या बदलांमुळे व्यापारसुलभता वाढेल, मार्केट रीच वाढेल आणि ग्राहकांबरोबर संवाद वाढण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे नवीन संधी निर्माण होतील, विक्रेत्यांना नवीन संधी उपलब्ध होतील आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर विक्रीचा नवीन अनुभव मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.”

नवीन रेट कार्ड योजनेचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत.

सोपं रेट कार्ड- हे नवीन रेट कार्ड चार महत्त्वाच्या (फिक्स्ड, कमिशन, कलेक्शन, शिपिंग) गोष्टींपासून (फिक्स्ड आणि कमिशन) यामुळे सेटलमेंट मध्ये आणि पारदर्शकता वाढेल. रेट कार्डच्या सुलभीकरणामुळे फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांची व्यापारसुलभता वाढेल आणि त्यांच्या मुख्य क्षमतांवर लक्ष देण्यास सोपं होईल.

 

योग्य शिपिंग दर- शिपिंग धोरणात सुधारणा करून विक्रेत्यांमध्ये पारदर्शकता वाढवण्याचा फ्लिपकार्टचा उद्देश आहे. यामध्ये ५०० ग्रॅ पेक्षा कमी वस्तु स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर पाठवल्या तर अतिरिक्त दर लागणार नाही. मात्र राष्ट्रीय पातळीवर ५०० ग्रॅ पेक्षा अधिक वजनाच्या वस्तू पाठवल्या तर अतिरिक्त दर लागेल.

 

सोपी आणि न्याय्य वाढ- पारदर्शक फी रचना असल्यामुळे नवीन रेट कार्ड मुळे व्यवसायात योग्य आणि न्याय्य वाढ होईल. या बदलामुळे विक्रेत्यांना त्यांच्या व्यापार वाढीसाठी मदत होईल आणि विक्रेत्यांसाठी योग्य वातावरण तयार होईल.

 

फुलफिलमेंट बाय फ्लिपकार्ट अधिकाधिक किफायतशीर करणे- फुलफिलमेंट बाय फ्लिपकार्ट हा विक्रेत्यांसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. नवीन रेट कार्डामुळे हे आणखी किफायतशीर झाले आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा आणखी फायदा होईल. या उपक्रमामुळे उद्योगात क्रांती होईल आणि विक्रेत्यांसाठी ग्राहकांपर्यंत प्रभावी दरात पोचण्यासाठी सोपं होईल.

 

या उपक्रमामुळे फ्लिपकार्टच्या इ-कॉमर्स क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या उद्दिष्टाला आणखी बळकटी मिळाली आहे.

 

नवीन रेट कार्डमध्ये काही क्षेत्रं वगळण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी SLC पेजला भेट द्या.

 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.

 

For more information, please click the link here

– Rate Card – FAQ

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments