आज आरोग्याचा निर्धार, अन उद्या हानीकारक आहार? सफोलाचे हे विचलित करणारे छापील विधान निरोगी जीवनशैली दररोज कठोरपणे पाळण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
~ जागतिक आरोग्य दिवसानंतर लगेचच, सफोला निरोगी जीवनशैली, दररोज अंगिकारण्याच्या महत्त्वास बळकटी देते व गेल्या वर्षी ’जागतिक हृदय दिवसाच्या निमित्ताने शेअर केलेला संदेश प्रतिध्वनित करते.
पुणे, मे 7 ,2024: सफोलाची तेलाचा डाग दाखवणारी सर्वात अलिकडील छापिल जाहिरात मोहिम देशभरातील अनेक वर्तमानपत्रात झळकली आणि तिने वाचकांना त्यांच्या सकाळच्या दिनचर्येत झटका दिला. #RozKaHealthyStep.चे पालन करून उत्तम हृदय आरोग्य व निरोगी जीवनशैलीस प्रोत्साहन देत, अलिकडील ’जागतिक हृदय दिनाच्या’ च्या निमित्ताने सादर केलेल्या संवादाच्या माध्यमा्द्वारे सफोला त्यांच्या निरंतर प्रयत्नांतून जनतेस प्रेरणा देत आहे.
आरोग्य एका दिवसात निर्माण होत नाही या वस्तुस्थितीवर भर देण्यासाठी जनतेस जागरूक करण्याच्या हेतूने निर्माण केलेल्या मुखपृष्ठावरील या सृजनशील जाहिरातीत छापिल बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मूठभर पकोडे व आजूबाजूस तेलाचे डाग दाखवले आहेत आणि अधिक उत्तम आरोग्य व खुशालीत सातत्यता आणण्यासाठी #RozKaHealthyStep चे पालन करा, केवळ फक्त जागतिक आरोग्य दिन पाळण्यापलिकडे प्रयत्न करण्यावर भर दिला आहे.
याचा हेतू आपली एकसारखीच अशी एक आठवण करून देणे हा आहे: ती आहे वर्तमानपत्राच्या पानावर देलेली रस्त्याच्या कडेस विकली जाणारी भजी खाण्यात मिळणारा, अपराधीपणाची जाणिव करून देणारा आनंद. हे चित्र, जागतिक आरोग्य दिन आणि असे अनेक प्रसंग संपल्यानंतर लगेच कसे विसरले जातात आणि निरोगी अन्न सेवनाचे निर्धार विसरून आपण आरोग्यास हानिकारक खाण्याच्या सवयींकडे लगेच कसे परत जातो हा संदेश पोहोचवण्यात मदत करते. म्हणूनच, केवळ विशिष्ट समारंभ किंवा प्रसंगांवर ध्यान केंद्रित करण्याऐवजी, दररोज त्त्यांच्या अन्न सेवनाच्या सवयी जोपासण्यास प्राधान्य देण्यासाठी व्यक्तींना प्रोत्साहित करणे हा याचा हेतू आहे. या संदेशांद्वारे वाचकांच्या मनाच्या तारा जुळल्या आणि समाजमाध्यमांवर रोचक संवाद सुरू झाले.
या मोहिमेबद्दल बोलताना, मेरिको लिमिटेडचे प्रमुख मार्केटिंग व्यवस्थापक, सोमाश्री बोस अवस्थी म्हणाले, “आरोग्य विषयक निर्धारांचे पालन करणे खूप मोठे आव्हान असू शकते. आमचे उद्दिष्ट ग्राहकास एक निरोगी जीवनशैली सातत्याने दररोज पालन करण्यास मदत करणे हे आहे. आम्ही हा संदेश जागतिक आरोग्य दिनीच देण्याऐवजी तो पुढच्या दिवशी देण्याचा हा असामान्य मार्ग पत्करला ज्यामुळे त्याक्षणी वाचकांचे ध्यान आकर्षित केले आणि महत्त्वाच्या प्रसंगी केलेले निर्धार लगेच काही दिवसांनी कसे विसरले जातात याची त्यांना आठवण करून दिली. जिथे आमचे मौल्यवान ग्राहक संपूर्णत: गुंतलेले असतात तिथे त्यांच्याशी संपर्क करून आणि त्यांना Roz Ka Healthy Step ची निवड करण्याची आठवण दररोज करून, ते आरोग्यदायक प्रवास अर्ध्यावर सोडत नाहीत याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.”
मुलन लिंटासचे चीफ क्रियेटिव्ह ऑफिसर (सीसीओ) राम जयरामन म्हणाले, ” काही वेळा, सर्वोत्कृष्ट संदर्भगर्भित/विषयाशी संलग्न जाहिरात जाणून बुजून काही दिवसांनंतर दिली जाते. सफोलाचा उत्तम आरोग्य कालांतरांत तयार होते यावर विश्वास आहे आणि म्हणूनच जागतिक आरोग्य दिवस या एकाच दिवशी आम्ही मुद्दाम मौन बाळगले. सातत्यपूर्ण, निरंतर कृतींतून खराखुरा विजय मिळतो याची लोकांना आठवण करून देण्यासाठी आमची सृजनात्मक जाहिरात आम्ही काही दिवसांनंतर प्रकाशित केली. आणि आजच्या डिजिटल-प्रथम जगात, आपले आवडते, जुन्या जमान्यातील वर्तमानपत्र अशी काहीतरी किमया करताना पाहून खूप आनंददायक विरोधाभास वाटला.
मॅडिसन मिडिया अल्ट्राच्या सीओओ जोलीन सोळंकी सांगतात, ” सामान्यत: संवादातून बदल घडतो. ग्राहकांना #RozKaHealthyStep चे पालन करण्याचा आग्रह करण्याचा सफोलाचा प्रवास हा निरंतर प्रवास आहे, परंतु ग्राहकाला केवळ आग्रह करणेच महत्त्वाचे नाही तर त्यांच्या जीवनात आरोग्याचे स्थान कशा प्रकारे दुय्यम झाले आहे याकडे त्याचे ध्यान वेधणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही मोहिम सृजनशीलता आणि माध्यम यांचा योग्य मिलाप संदेशास संदर्भासह व प्रभावीपणे कशा प्रकारे प्रसारित करू शकतो आणि याचा परिणाम श्रोत्यांवर अधिक मोठ्या प्रमाणात संवाद घडवून आणण्यात कशा प्रकारे होऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण आहे.
अधिक निरोगी जीवनशैलीसाठी, साध्या, दैनंदिन सवयींचे पालन करण्याकरिता ग्राहकांची जागरूकता वाढवण्यात व त्यांचे मार्गदर्शक करण्यासाठी, विविध माध्यमे व व्यासपीठे वापरून हा संवाद पुढे चालू ठेवण्याशी हा ब्रॅंड कटिबध्द आहे
मेरिको लिमिटेड बद्दल:
मेरिको (बी एस ई 531642, एन एस ई: “MARICO”) ही वैश्विक सौंदर्य व खुशाली उद्यमात कार्यरत ग्राहक उत्पादन कंपनींपैकी भारतातील अग्रणी संस्थांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मेरिकोने भारतात व आशिया व आफ्रिकेतील निवडक बाजारपेठांत त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून सुमारे USD 1.2 बिलियनची उलाढाल केली .
मेरिकोचा, त्यांच्या पॅरॅशूट, सफोला, सफोला फिटिफाय गुर्मे, सफोला निम्युनि/वेद, हेअर ॲन्ड केअर, पॅरॅशूट ॲडव्हान्स्ड, निहार नॅच्युरल्स, मेडिकेर, प्युअर सेन्स, कोको सोल, रिव्हाइव्ह, सेटवेट, लिव्हॉन, जस्ट हर्ब्स, ट्रु एलिमेंट्स आणि बियर्डो सारख्या उत्पादनांतून त्यांचा प्रत्येकी 3 भारतीयांपैकी एकाच्या जीवनाशी संबंध येतो. आंतरराष्ट्रीय ग्राहक उत्पादन श्रेणीचे त्यांच्या पॅरॅशूट, पॅरॅशूट ॲडव्हान्स्ड, हेअरकोड, फियान्से, काइविल, हर्क्युलस, ब्लॅक शिक, कोड 10, इंग्वे, एक्स-मेन, थुआन फट आणि आअयसो प्लस सारख्या उत्पादनांतून समूहाच्या उत्पन्नात 23% योगदान आहे.


