इझमायट्रिप.कॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने या तिमाहीदरम्यान आपली प्रबळ आर्थिक कामगिरी कायम ठेवली. आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीसाठी कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक ४१ टक्क्यांच्या वाढीसह १,६४० दशलक्ष रूपये होता. ईबीआयटीडीए वार्षिक २४ टक्क्यांच्या वाढीसह ५७७ दशलक्ष रूपये होते. करपूर्व नफा वार्षिक २४ टक्क्यांच्या वाढीसह ५५१ दशलक्ष रूपये होता. तसेच, ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यू (जीबीआर) आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीमध्ये २०,९०० दशलक्ष रूपये होते.
आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीमध्ये आमच्या नॉन-एअर विभागाने प्रबळ वाढ केली, जेथे एकूण हॉटेल नाइट बुकिंग्ज १.४ लाख होत्या, ज्यामध्ये ३९ टक्क्यांची वाढ झाली आणि इतर बुकिंग्ज ५३ टक्क्यांच्या वाढीसह २.७ लाख होत्या. आर्थिक वर्ष २४ साठी हॉटेल नाइट बुकिंग्ज व इतर बुकिंग्ज अनुक्रमे ४९ टक्क्यांच्या वाढीसह ५.२ लाख आणि ६७ टक्क्यांच्या वाढीसह १०.४ लाख होत्या.
आर्थिक वर्ष २४ साठी कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक ३२ टक्क्यांच्या वाढीसह ५,९०६ दशलक्ष रूपये होता. ईबीआयटीडीए वार्षिक १९ टक्क्यांच्या वाढीसह २,२८२ दशलक्ष रूपये होते आणि करपूर्व नफा वार्षिक १६ टक्क्यांच्या वाढीसह २,१५१ दशलक्ष रूपये होता. या प्रबळ कामगिरीमधून इझमायट्रिपची सातत्यपूर्ण गती दिसून येते आणि उद्योगामधील काही लाभदायी आधुनिक टेक कंपन्यांपैकी एक म्हणून कंपनीचे स्थान अधिक दृढ होते. तसेच, कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये ८५,१२६ दशलक्ष रूपये जीबीआरची नोंद केली, ज्यामुळे कंपनीचे बाजारपेठेतील स्थान अधिक दृढ झाले आहे.
ही तिमाही आणि आर्थिक वर्ष २४ मध्ये प्रबळ आर्थिक कामगिरी संपादित करण्यासह इझमायट्रिपने विकास-केंद्रित कंपनी म्हणून स्वत:ला स्थापित करण्यासाठी लक्षणीय सहयोग सुरू केले. भारतीय इतिहासामधील मोठ्या इव्हेण्टनंतर कंपनीने जीवानी हॉस्पिटॅलिटीमध्ये ५० टक्के हिस्सा संपादित केला आणि अयोध्या शहरामध्ये १५० खोलींचे रॅडिसन ब्लू हॉटेल विकसित करण्यासाठी रॅडिसन हॉटेल ग्रुपसोबत सहयोग केला. या धोरणात्मक पुढाकारामुळे नुकतेच प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या राम मंदिराच्या सान्निध्यात हॉटेल स्थापित होईल, ज्यामुळे परिसराच्या आकर्षकतेमध्ये अधिक भर होण्यासह दरदिवसाला १.५ लाख भक्त हॉटेल सुविधेचा आनंद घेतील.
या तिमाहीमध्ये इझमायट्रिपने ७.९ ट्रिलियन रूपये विमा बाजारपेठेतील आपल्या सेवांमध्ये विविधता आणण्यासाठी आपली नवीन पूर्णत: मालकीची उपकंपनी इझमायट्रिप इन्शुरन्स ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेड देखील लाँच केली.
इझमायट्रिपने सरकारसोबत सहयोग दृढ केले, तसेच समान उद्दीष्टांची एकत्रित पूर्तता करण्यासाठी दृढ सहयोग स्थापित केला आहे. कंपनी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस लिमिटेडसाठी पहिली ट्रॅव्हल सहयोगी बनली, ज्याद्वारे ८ लाख व्हिलेज लेव्हल आंत्रेप्रीन्युअर्सना (व्हीएलई) ट्रॅव्हल सेवांसह फ्लाइट, हॉटेल, बस, कॅब, हॉलिडे आणि क्रियाकलाप या सेवा दिल्या जात आहेत. सीएससीचे प्रतिनिधीत्व करणारे हे समर्पित व्हीएलई नागरिकांना विविध सेवा वितरित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामध्ये ट्रॅव्हल सेवा प्रमुख ऑफरिंग आहे. तसेच, कंपनीने लखपती दीदी योजना अंतर्गत कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांच्या बचत गटांना सक्षम करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयासोबत सहयोग केला. हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने लक्षणीय पाऊल आहे.
आपल्या इझमायट्रिप फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि सीएसआरप्रती योगदान देत कंपनीने आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) सोबत सामंजस्य करार (एमओयू) केला. या सहयोगाचा सरकारच्या अडॉप्ट ए हेरिटेज २.० उपक्रमाचा भाग म्हणून इझमायट्रिप फाऊंडेशनला भारतातील चार सर्वात प्रतिष्ठित ऐतिहासिक वास्तूंसाठी स्मारक सारथी (मोन्यूमेण्ट मित्र) म्हणून नियुक्त करण्याचा मनसुबा आहे. नियुक्त स्मारक सारथी म्हणून इझमायट्रिपवर चार प्रतिष्ठित ऐतिहासिक वास्तूंची देखभाल व संवर्धनाची जबाबदारी असेल: दिल्लीमधील कुतूबमिनार, कोणार्कमधील सूर्य मंदिर, आग्रा किल्ला आणि खजुराहोमधील वेस्टर्न ग्रुप ऑफ टेम्पल्स, जेथे दरवर्षाला ६० लाखांहून अधिक अभ्यागत भेट देतात.
कंपनीने सर्व प्रवास गरजांसाठी सर्वसमावेशक सोल्यूशन प्रदान करण्याकरिता अनेक उत्पादने व सेवा विस्तारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दृष्टीकोनाचा अवलंब करत इझमायट्रिपने पंजाब नॅशनल बँकेसोबत सहयोगाने ‘पीएनबी ईएमटी क्रेडिट कार्ड’ लाँच केले, ज्यामुळे इझमायट्रिपला देशभरातील आपल्या १०,१०० हून अधिक शाखा नेटवर्कच्या माध्यमातून लाखो पीएनबी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.
तसेच, इझमायट्रिपने आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून भाड्याने सेल्फ-ड्राइव्ह कार सेवा देण्यासाठी झूमकारसोबत सहयोग केला, ज्यामुळे ग्राहकांसाठी प्रवास सोयीसुविधेमध्ये वाढ झाली.
इझमायट्रिप आपली देशांतर्गत उपस्थिती वाढवण्याप्रती कटिबद्ध राहिली, जेथे या तिमाहीमध्ये इंदौर, गुरूग्राम व जळगावमध्ये ४ फ्रँचायझी स्टोअर्स लाँच करत देशभरात धोरणात्मक प्रत्यक्ष फ्रँचायझी स्टोअर्सचे उद्घाटन केले. यामधून कंपनीची ट्रॅव्हल सेवा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याप्रती कटिबद्धता दिसून येते.
कंपनीने आपला पहिला देशव्यापी रोडशो आयोजित केला, ज्याचा व्यवसाय सहयोगांना चालना देण्याचा आणि देशातील प्रगती होत असलेल्या पर्यटन उद्योगामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा मनसुबा होता. या उपक्रमांतर्गत कोलकाता, रायपूर, नागपूर, इंदौर या शहरांमध्ये रोडशोज आयोजित करण्यात आले आणि त्यामध्ये १८०० हून अधिक बी२बी एजंट्सचा सहभाग दिसण्यात आला. हा उपक्रम इझमायट्रिपचे नुकतेच संपादित करण्यात आलेले देशांतर्गत ट्रॅव्हल ब्रॅण्ड्स गाइडलाइन ट्रॅव्हल आणि डूक ट्रॅव्हल्स यांच्यासोबत सहयोगाने आयोजित करण्यात आला.
शेवटचे म्हणजे, इझमायट्रिपला सॅटे इंडिया अवॉर्ड्सने प्रतिष्ठित ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट ऑफ द इअर पुरस्कारासह सन्मानित केले आहे आणि बेस्ट ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीसाठी व्हर्सटाइल एक्सलन्स ट्रॅव्हल अवॉर्ड (व्हीईटीए) २०२४ म्हणून मान्यताकृत आहे. या पुरस्कारांमधून इझमायट्रिपची सर्वोत्तमता, नाविन्यता आणि देशभरातील प्रवाशांच्या गरजांची पूर्तता करणारी सर्वसमावेशक ट्रॅव्हल इकोसिस्टम निर्माण करण्याप्रती कटिबद्धता निदर्शनास येते.


