Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड मनपा शाळा निकालाची परंपरा कायम

पिंपरी -चिंचवड मनपा शाळा निकालाची परंपरा कायम

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मराठी माध्यम व उर्दू माध्यमाच्या शाळांनी एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा चालू ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांना मनपा द्वारे पुरविण्यात येणा-या सुविधा, स्मार्ट सिटी अंतर्गत डिजिटल झालेले वर्ग तसेच चांगल्या पद्धतीने अध्यापन करणारा अध्यापक वर्ग व या सर्वांवर नियंत्रण करणारे मुख्याध्यापक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हा निकाल गाठणे शक्य झाले आहे.
वर्षभर सातत्याने विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे अनेक उपक्रम माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राबविले जातात. बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातून येतात. त्यांच्यासाठी वर्षभर नियमित परिक्षांबरोबरच सर्व विषयांच्या केंद्रीय परीक्षा, सराव परीक्षा घेण्यात येतात. यातून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेस सामोरे जाणे सोपे जाते.मार्च २०२४ च्या एस.एस.सी.बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल ९५.५२ व ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल ९८.२१,त्यानुसार मनपाच्या मराठी व ऊर्दू माध्यमाचा एकूण निकाल ९५.३६ एवढा लागलेला आहे. ९०% व त्यापुढे गुण मिळवणारे एकूण १८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रूपये, ८५ % ते ८९.९९ % पर्यंत गुण मिळवणारे ६७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार व ८० % ते ८४.९९% गुण मिळवणा-या ११२ विद्यार्थ्यांना २५ हजार तसेच दिव्यांग असलेले १८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे मनपा मार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस रक्कम देणेत येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments