Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे दौंड तालुक्यातील केडगाव येथे आयोजन*

पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे दौंड तालुक्यातील केडगाव येथे आयोजन*

*

पुणे, दि. २७: कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय पुणे आणि नेताजी शिक्षण संस्थेचे सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय केडगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३ हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांसाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी अशा विविध शैक्षणिक पात्रताधारकांना रोजगाराची संधी आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments