*
पुणे : सक्षम भारत, समर्थ भारत, जिते जिते रक्तदान, जाते जाते नेत्रदान, सक्षम भारतम्, समर्थम्म भारतम अशा घोषणा देत कर्वेनगरातील मुख्य मार्गावर तब्बल दोन तास निघालेल्या शोभायात्रेतील संत सूरदास, महामुनी अष्टावक्रच्या सहा फुटी प्रतिमांनी रविवारी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले.
समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ (‘सक्षम’) या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या राष्ट्रीय संस्थेच्या त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनानिमित पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या फाटक क्रमांक दोन येथून या शोभायात्रेस सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराज यांनी या यात्रेला प्रारंभ केला.
दिव्यांगांचे शिक्षण पुनर्वसन, आरोग्य रोजगार व सामाजिक विकास यासाठी देशभरात ४३ प्रांतामध्ये काम करणाऱ्या या संस्थेचे विविध प्रांतामधील १५०० प्रतिनिधीसह दिव्यांगांचे प्रतिबिंब या शोभायात्रेत उमटले. कर्वे रोड, उड्डाणपूल, वनदेवी, गांधी भवन सिग्नल, वारजे रोड, वनदेवी, उड्डाण पुल मार्गे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या फाटक क्रमांक १० येथे याची सांगता झाली.
या शोभायात्रेत अडॉप्शनसह ५० दिव्यांगांच्या स्कूटरस्वार प्रतिनिधी, ध्वनी व्यवस्थेसह तीन चित्ररथ, चारचाकी वाहने, रिक्षा,१ रुग्णवाहिका सहभागी झाल्या. या शोभायात्रेस नियंत्रित करण्यासाठी १०० स्वयंसेवक सहभागी होते. या शोभायात्रेचे विविध ठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत झाले. दक्षिण भारत, मध्य भारत, उत्तर भारत, पूर्व भारत आणि शेवटी पश्चिम भारतातील प्रतिनिधी त्या त्या राज्यातील पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.
तेरा मिनिटांची चित्रफीत ठरली आकर्षण
या शोभायात्रेत सक्षमने तयार केलेली तेरा मिनिटांची चित्रफीत आकर्षण ठरली. याशिवाय नेत्रदान, रक्त दान, अवयवदान याविषयी जागृती करणारे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते.
फोटो आहे..
फोटो : पुण्यात कर्वेनगर परिसरात सक्षमच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी सकाळी काढलेल्या शोभायात्रेत देशभरातून आलेल्या १५०० प्रतिनिधींनी भाग घेतला.
——
*प्रेरणादायी दिव्यांग व्यक्तींचा विशेष सत्कार*
दिव्यांग व्यक्तींच्या प्रेरणादायी सफळ कथा देशातील प्रत्येक प्रांतामध्ये सक्षमचे कार्यकर्ते पोहचवतील असा विश्वास मटाले यांनी व्यक्त केला. रविवारी दुपारच्या विशेष सत्रात ते बोलत होते. प्रेरणादायी दिव्यांग व्यक्तिमत्व म्हणून अहमदाबादचे प्रसिद्ध आयटी उद्योजक शिवम पोरवाल, महाबळेश्वरचे प्रसिद्ध उद्योजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भावेश भाटिया, अभिनेत्री गौरी गाडगीळ आणि ३५ वेळा गिर्यारोहण करणारे सागर वसंत बोडके, इंदूरचे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जलतरणपटू पद्मश्री सत्येंद्रसिंग लोहिया यांचा विशेष सत्कार सक्षमचे संरक्षक डॉ. दयालसिंग पन्वांर, राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह सेवा प्रमुख राजकुमार मटाले, सहसचिव अभय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. महामंत्री उमेश अंधारे यांनी सूत्र संचालन केले. दुभाषा माधुरी गाडेकर यांनी भारतीय सांकेतिक भाषेतून संचालन केले. स्वाती धारे यांनी आभार मानले.


